कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे संदर्भात , महत्वपूर्ण शासन ज्ञापन निर्गमित दि.12.12.2024

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee employee payment shasan dnyapan] : कर्मचाऱ्यांचे वेतन (payment ) अदा करण्याकरिता निधीचे वितरण करणे संदर्भात इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन ज्ञापन निर्गमित करण्यात आले आहेत .

सदरच्या शासन ज्ञापणानुसार राज्यातील इतर मागास प्रवर्ग विभक्त जाती , भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 100 विद्यार्थी क्षमतेचे मुलांसाठी 01 व मुलींसाठी 01 याप्रमाणे 36 जिल्ह्याच्या ठिकाणी 72 शासकीय वसतिगृहे शासनाने स्वतः इमारत भाड्याने घेवुन कार्यान्वित करण्याचा निर्णय दिनांक 28 फेब्रुवारी 2023 व दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे .

तर संचालक , इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांनी दिनांक 04 डिसेंबर 2024 रोजीच्या पत्रानुसार वसतिगृहाकरिता बाह्य यंत्रणेद्वारे नियुक्त कर्मचारी वर्गाचे वेतन (Payment) देयके भागवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे .

यानुसार राज्यातील इतर मागास प्रवर्ग , विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या , वसतिगृहाकरिता बाह्य यंत्रणेद्वारे नियुक्त कर्मचारी वर्गाचे वेतन देयके भागवण्यासाठी एकूण रुपये 89,16,301/- इतका निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे .

सदर निधीचे वितरणामुळे राज्यातील वरी नमूद कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन अदा केले जाणार आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment