Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee election janjagruti mohim ] : सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे सत्र सुरू आहे . दिनांक 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत . या निवडणुकीमध्ये राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या 100% मतदारांकरिता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे .

मागील लोकसभा निवडणुका 2024 मध्ये राज्यातील बरेच अधिकारी / कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले . म्हणजेच राज्यातील मतदान यंत्रणा यशस्वी राबवणारे अधिकारी / कर्मचारीच आपल्या हक्काच्या मतदानापासून वंचित राहतात , ही  अतिशय वाईट बाब आहे . तर काही जिल्ह्यांमध्ये पोस्टल बॅलेट पासून अनेक मतदान अधिकारी / कर्मचारी वंचित राहिले आहेत .

यामुळेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी भेट घेऊन अधिकारी / कर्मचाऱ्यांना पोस्टर बॅलेटची सुविधा उपलब्ध करून देणे , त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना मतदानाकरिता आवश्यक ती सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात यावे , असे निवेदन देण्यात आले आहे .

त्याचबरोबर राज्यातील अधिकारी / कर्मचारी 100% मतदान करावे , याकरिता संघटनेच्या वतीने जनजागृती केली जात आहे . यामध्ये राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांच्या जुनी पेन्शन (old pension ) या प्रमुख मागणी करिता Vote for OPS ही भूमिका बजावली जाणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *