Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee election duty cancelation ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना जर निवडणुक ड्युटी लागल्यास , त्यांची ड्युटी रद्द करायची असल्यास , त्यांना फक्त काही नमुद करण्यात आलेल्या कारणांसाठीच ड्युटी रद्द करता येते . सविस्तर कारणे पुढीलप्रमाणे पाहु शकता .

जर आपणांस निवडणुक ड्युटी लागल्यास , रद्द करण्यासाठी प्रथम आदेश परिशिष्ठ – अ मध्ये सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांना शिफारस पत्र जोडून सदर निवडणूक आदेश रद्द करुन घेवू शकता . यांमध्ये प्रथम अधिकारी / कर्मचारी दिव्यांग असल्यास , तसा दाखला देणे आवश्यक असेल .

02. गरोदर असल्यास : अधिकारी / कर्मचारी गरोदर असल्यस तसा वैद्यकीय दाखला जोडावा लागेल . तसेच अधिकाारी / कर्मचारी हे स्तनदा माता असल्यास , त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडून ड्युटी रद्द करुन घेवू शकता .

03. अधिकारी / कर्मचारी निलंबित / फरार असल्यास : अधिकारी / कर्मचारी हे निलंबित असल्यास , तसेच ते फरार असल्यास तसा त्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही / शिक्क्यासह स्पष्ट पत्र सादर करावे लागते .

04. दीर्घ मुदतीच्या रजेवर असल्यास : अधिकारी / कर्मचारी हे दीर्घ मुदतीच्या रजेवर असल्यास तसा संबंधित कार्यालय प्रमुखांच्या सही / शिक्यांसह पत्र सादर करणे आवश्यक असेल . तसेच अधिकारी / कर्मचारी हे देशाबाहेर कामासाठी मान्य प्रवासी रजेवर असल्यास ,तसेच परदेशी अथवा देशांतर्गत प्रवास करीत असल्यास निवडणुक ड्युटी रद्द करता येते .

05.गंभीर आजार : अधिकारी / कर्मचारी हे गंभीर आजाराशी झुंजत असल्यास , तसा दाखला देवून निवडणुक ड्युटी रद्द करता येते . तसा वैद्यकीय दाखला सादर करणे आवश्यक असते .

06. या शिवाय दुबार आदेश असल्यास तसेच अन्य विधानसभा मतदारसंघाकडे कार्यरत असल्यास , तसेच मुलीचा/ मुलाचा विवाह असल्यास , तसेच कर्मचारी हा वर्ग – 4 मध्ये कार्यरत आहे परंतु मतदान अधिकारी कामकाज दिला असल्यास , तसेच कर्मचारी मयत, बदली झाले आहे , या वेळी निवडणुक आदेश रद्द करता येते .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *