Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment Pranali GR ] : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक तसेच खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी, २०२४ पासूनचे वेतन सीएमपी (CMP) प्रणालीमार्फत / ज्या जिल्ह्यांत ई-कुबेर (E-Kuber) कार्यरत आहे, त्या जिल्ह्यांत ई- कुबेर (E-Kuber) प्रणालीमार्फत थेट संबंधिताच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. 

भारतीय स्टेट बँकेच्या सीएमपी (CMP) प्रणाली व ई-कुबेर (E-Kuber) प्रणालीमार्फत प्रदानासंदर्भात “परिशिष्ट अ” मध्ये जोडण्यात आलेल्या सूचना देण्यात येत आहेत. सर्व आहरण व संवितरण अधिकारी आणि संबंधित कोषागार अधिकारी त्यांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. भारतीय स्टेट बँकेच्या सीएमपी (CMP) प्रणाली व ई-कुबेर (E-Kuber) णालीमार्फत प्रदानासंदर्भात खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. सर्व आहरण व संवितरण अधिकारी आणि संबंधित कोषागार अधिकारी त्यांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. 

१) वित्त विभागाच्या दिनांक २८/६/२०१३ रोजीच्या शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे सर्व संबंधित आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या तसेच संबंधीत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बँक खात्यांच्या तपशीलाची पडताळणी पूर्ण केल्याबाबतची खात्री करावी . आहरण व संवितरण अधिकाऱ्यामार्फत अदात्याला करावयाचे प्रदान त्यांनी प्राधिकृत केल्यानंतरच प्रदान होणार आहे. त्यामुळे अदात्याचे नाव, खाते क्रमांक व आयएफएससी कोड योग्य असल्याची खात्री करणे अनिवार्य राहील. यामधील चुकांमुळे होणाऱ्या चुकीच्या प्रदानास आहरण व संवितरण अधिकारी जबाबदार राहतील. 

२) आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी वेतन देयक तयार करताना वेतन व भत्त्यांबाबतच्या आवश्यक असणाऱ्या दुरुस्त्या केल्यानंतर अशासकीय वजातीच्या (Non-Government Recoveries) नोंदी कराव्यात. अशासकीय वजाती करणे / न करणे याबाबत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बाबतीत गटशिक्षण अधिकारी तसेच खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मुख्याध्यापकांनी स्तरावरुन निर्णय घ्यावा. सदर अशासकीय वजातीच्या रक्कमा गटशिक्षण अधिकारी/मुख्याध्यापक यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. वेतन देयक पूर्णपणे शालार्थ प्रणालीमार्फत संस्करीत होऊन देयकाचे प्राधिकारपत्र (Authorization Slip) तयार झाल्यानंतर अशासकीय कपाती करण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही. सदर अशासकीय वजातीच्या रक्कमा वाटप करण्याची जबाबदारी संबंधित गटशिक्षण अधिकारी/मुख्याध्यापक यांची राहील. 

३) शालार्थ प्रणालीमध्ये आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी वेतन एकत्रीत (Consolidate) केल्यानंतर, सविस्तर गोषवारा (Detail Abstract) व सीएमपी अहवालाची (CMP Report) पडताळणी करूनच प्राधिकारपत्र (Authorization Slip) तयार करणेचे आहे. 

) शालार्थ प्रणालीवर यापुढे देयक तयार झाल्यानंतर ते सिस्टीम इंटीग्रेशनच्या माध्यमातून बीम्स या प्रणालीवर अर्थसंकल्पीय तरतूदींची खात्री करण्याकरिता पाठविण्यात येईल. बीम्समध्ये तो खर्च नोंदविल्यानंतर इतर माहिती व प्राधिकार पत्रासह (Authorization Slip) बीम्स कडून पुन्हा शालार्थवर प्राप्त होईल, याचवेळी शालार्थ प्रणालीमधून प्रत्येक कर्मचाऱ्याला करावयाचे अंतिम वेतन तसेच अशासकीय रक्कम संबधीत डीडीओ लेवल १ म्हणजेच संबधीत शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व एनपीएसची रक्कम संबंधीत डीटीओ (DTO) यांना प्रदान करणेकामी आवश्यक ती माहिती भारतीय स्टेट बँकेच्या सीएमपी सर्व्हवर पाठविली जाईल. आहरण व संवितरण अधिकाऱ्याने सदर देयकासोबत बीम्स प्रणालीतून शालार्थमध्ये प्राप्त झालेल्या प्राधिकार पत्राची प्रत मुद्रीत करुन वेतन देयकासोबत जोडावी आणि देयक कोषागारात सादर करावे. 

५) त्यानंतर आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना स्टेट बँकेकडून देण्यात येणाऱ्या सांकेतांकाने सीएमपी सर्व्हरवरील प्रणालीत प्रवेश करुन प्रस्तावित प्रदानांचा तपशील योग्य असल्याची खात्री करून ‘Approve’ या बटणावर क्लिक करावे. 

६) अशा प्रकारे आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सीएमपी प्रणालीवर मान्यता दिल्यानंतर सीएमपी प्रणालीद्वारे, नेमून दिलेल्या दिवशी भारतीय स्टेट बँकेमार्फत इलेक्ट्रॉनिक पध्दतीने थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात त्यांना प्रदान करावयाची वेतनाची रक्कम जमा होतील. तसेच अशासकीय वजातीची रक्कम संबंधित डीडीओ लेवल १ म्हणजेच संबधीत शाळा / कॉलेजच्या जॉईंट बँक खात्यामध्ये जमा होतील व एनपीएसच्या रक्कम संबधीत डीटीओच्या खात्यामध्ये जमा होतील. 

७) देयक कोषागारांत पारित झाल्यानंतर आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सध्याच्या प्रचलित पध्दतीनुसार प्रमाणक क्रमांक व दिनांकाची शालार्थ प्रणालीवर नोंद करावी. त्यानंतरच शालार्थद्वारे पुढील महिन्याचे वेतन देयक तयार करणे शक्य होईल. 

८) भारतीय स्टेट बँक यांच्या सीएमपी (Cash Management Project (CMP)) शाखा यांचेमार्फत सुरक्षित पोर्टल विकसित करण्यात आलेले असून ते प्रस्तावित कार्यपध्दतीमध्ये Electronic Payment Gateway म्हणून काम करेल. या पोर्टलचा URL https://cmp.onlinesbi.com/mahakosh असा आहे. 

९) राज्यातील या विभागातंर्गत येणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी शालार्थ प्रणालीसाठी वापरण्यात येणारा संकेतांक (युजर आयडी/पासवर्ड) वापरावयाचा आहे. 

या संदर्भातील राज्य शासनांच्या शालेय शिक्ष्ण व क्रिडा विभागांकडून दिनांक 04 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *