लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवळा दाखविला आहे . सध्या उन्हाच्या वाढत्या उष्णतेमुळे वयस्कर कर्मचाऱ्यांना उष्मज्वर सारखे त्रास होताना दिसून येत असल्याने , सदर कर्मचाऱ्यांना कर्तव्यांमध्ये सवलत देणेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत . सदर आदेशान्वये नेमके कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांना सवलत मिळणार आहे , याबाबची सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे पाहुयात ..
दि.17 मे 2023 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे वरुन मुंबईस रवाना होत असताना , भर उन्हात वाहतुक पोलिस कर्तव्य बजावत होते . हे चित्र पाहून मुख्यमंत्री यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रती संवेदनशीलता दाखवत ज्येष्ठ नागरिकांना कर्तव्यांमध्ये सवलत देणेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करुन सांगितले आहे . यांमध्ये 55 वर्षापलीकडील ज्येष्ठ नागरिकांना यांचा फायदा मिळणार आहे .
हे पण वाचा : पेन्शन योजनेबाबत उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सल्ला !
सध्या उन्हाचे प्रमाणे अधिकच उष्ण झाले असल्याने , 55 वर्षापलिकडील ज्येष्ठ वाहतुक कर्मचाऱ्यांना यापुढे उन्हात कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करु नये , तसेच वाहतुक पोलिसांना उष्णतेपासून संरक्षण मिळावे याकरीता तात्पुरत्या शेड्स त्याचबरोबर छत्रींची सोय करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत , त्याचबरोबर पिण्यांसाठी पाण्याची सोय करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत . या संदर्भातील कार्यवाही करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांशी फोन द्वारे संवाद साधून आदेश देण्यात आले आहे .
यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या प्रति असणारी संवेदनशिलता समोर येत आहे . या आदेशांमुळे ज्येष्ठ ( 55 वर्षावरील ) वाहतुक पोलिसांना उन्हांपासून संरक्षण मिळेल अशा पद्धतीने सावलीत कर्तव्य बजावता येणार आहेत .
शासकीय कर्मचारी , नोकर पदभरती , इतर घडामोडींच्या अपडेट करीता Whatsapp ग्रूपमध्ये सामिल व्हा !