कर्मचाऱ्यांच्या पेहराव संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.15.03.2024

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Dress Code Shasan Nirnay ] : कर्मचाऱ्यांच्या पेहराव संदर्भात मागदर्शक सुचना  निर्गमित करणे व संबोधनाबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 15 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे पेहराव कसे असावेत याबाबत मार्गदर्शक सुचना देण्यात आलेले आहेत , यांमध्ये सर्व शिक्षकांचा दैनिक पेहराव हा शिक्षकीय पदाकरीता अनुसरुन असणे आवश्यक असावेत . तसेच सर्व शिक्षकांनी परिधान करण्यात आलेले पेहराव हा व्यवस्थित असावेत जसे कि सर्व महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार / चुडीदार , दुपट्टा , कुर्ता अशा पद्धतीने पेहराव करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत ,

तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट , शर्ट इन करुन परिधान केलेले असावेत . गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम असणारे / चित्रे असणारे पेहराव परिधान करण्यात येवू नयेत त्याचबरोबर शिक्षकांनी जीन्स तसेच टी-र्शटचा वापर शाळांमध्ये करण्यात येवू नयेत असे सुचित करण्यात आलेले आहेत .

तसेच परिधान करण्यात आलेला पेहराव हा स्वच्छ तसेच नीटनेटका असणे आवश्यक असणार आहे याची दक्षता सर्व शिक्षकांनी घेण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहेत . तसेच शाळेने सर्व शिक्षकांकरीता एकच ड्रेस कोड ठरवावेत , यांमध्ये पुरुष व महिला शिक्षक यांच्याकरीता परिधान करावयाचा पेहरावाचा रंग हा फिकट असावा तर पॅन्टचा रंग हा गडद असावेत , तर महिला व पुरुष शिक्षकांनी पोषाखाला शोभतील अशी पादत्राणे जसे कि पुरुषांनी शुजचा वापर करण्यात यावा ..

तर स्काऊट गाईडच्या शिक्षकांनी स्काऊट गाईडचे ड्रेस वापरावेत , यांमध्ये वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना / महिला शिक्षकांना बूट ( शुज ) वापरण्यामधून सवलती देण्यास येणार आहे .

तसेच राज्यातील सर्वच व्यवस्थापनांच्या शाळा अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापुर्वी Tr. अथवा टि असे संबोधावेत असे निर्देश करण्यात आलेले आहेत . या संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 15 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment