राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त 25,000/- सण अग्रिम बाबत महत्वपूर्ण पत्र !

Spread the love

Live marathipepar संगीता पवार, प्रतिनिधी : राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्ताने सण साजरा करण्याकरिता दरवर्षी 12,500/- रुपये इतकी रक्कम सन अग्रिम म्हणून दिली जाते . सदर सन अग्रिम रकमेमध्ये वाढ करणे संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रति महत्वपूर्ण मागणी पत्र सादर करण्यात आलेला आहे .

सदर मागणी पत्रकामध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना दिवाळी सण अग्रीमा मध्ये वाढ होणे , संदर्भात निवेदन देण्यात आलेले असून , यामध्ये नमूद करण्यात आले आहे की , जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना दिवाळी सण अग्रीम 12,500/- रुपये इतकी रक्कम उपलब्ध होते . परंतु महागाईत खूप वाढ झाल्याने व केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना बोनस नसल्याने 12,500/- इतकी रक्कम सण साजरा करण्यासाठी पुरेशी ठरत नाही ..

त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना 12,500/- ऐवजी 25,000/- रक्कम अग्रीम मिळाल्यास , दिवाळी व सण चांगल्या प्रकारे साजरा करता येईल . तरी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी अग्रिम मध्ये वाढ करून 25,000/- इतकी अग्रीम देणेबाबत शिफारस करण्यात येत आहे ..

दरवर्षी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 12,500/- इतकी रक्कम सण अग्रिम म्हणून दिवाळी सणाला दिली जाते . सदर अग्रिमाची परतफेड पुढील दहा महिन्यांमध्ये 1,250/- प्रमाणे वेतनातून वसूल करण्यात येते . सदर अग्रीम मध्ये वाढ केल्यास 2,500/- प्रमाणे वेतना मधून कपात केले जाईल .

या संदर्भातील कर्मचाऱ्यांकडून अग्रीम मध्ये वाढ करणेबाबत केलेली मागणी पत्र खालील प्रमाणे पाहू शकता..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment