Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Demands solve in adhiveshan ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित प्रश्नांवर या अधिवेशात तोडगा निघण्याची शक्यता आहे . कारण येत्या एप्रिल- मे महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने , केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यात येत आहेत . यानुसार राज्य सरकारकडून देखिल सकारात्मक निर्णय घेण्यात येतील .
जसे कि राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , गंभीर नोंद घेवून चर्चा लावण्याचे आदेश अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्ष यांनी राज्य सरकारला आदेश दिले आहेत , यावर राज्य सरकारने देखिल गंभीर नोंद घेतली आहे . त्याचबरोबर जुनी पेन्शन नंतर इतर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत , अशा प्रलंबित प्रश्नांवर देखिल सकारात्मक तोडगा काढण्यात येणार आहेत .
Retirement Age : सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरुन 60 वर्षे करणेबाबत राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून असणाऱ्या मागणीवर राज्य शासनांकडून या अधिवेशानात सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची मोठी शक्यता आहे . कारण राज्य शासनांकडून याबाबत प्रस्ताव तयार केले असल्याची माहिती मिडिया रिपोर्टनुसार समोर येत आहेत . यामुळे लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल .
आश्वासित प्रगती योजना मधील ग्रेड पे एस – 20 ची कमाल मर्यादा काढण्याची राज्य कर्मचाऱ्यांनी मागणी करण्यात आलेली आहे , यावर देखिल अधिवेशनात निर्णय होवू शकतो .तसेच उत्कृष्ट कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ , सातव्या वेतन आयोगामध्ये वेतनत्रुटी आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणे अशा अनेक प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघू शकतो .
कारण कर्मचारी संघटनांनी दिलेल्या 31 मागण्यांपैकी शासन स्तरावर वरील मागणींबाबत प्रशासकीय कार्यवाही / प्रस्तावाचे कामकाज सुरु असल्याचे नमुद करण्यात आलेले होते . यामुळे सदर प्रलंबित मागणीवर सकारात्मक निर्णय सदर अधिवेशात होवू शकतो .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.