मराठी लाईव्ह पेपर , संगिता पवार : राज्य कर्मचाऱ्यांना 24 प्रलंबित मागणींवर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनांकडून बैठक आयोजित करण्यात आलेली होती , सदर प्रलंबित मागणींवर राज्य शासनांकडून सविस्तर चर्चा करुन , निर्णय घेण्यात आलेले आहेत , सदर बैठकीचे सविस्तर इतिवृत्त राज्य शासनांकडून शासन परिपत्रक स्वरुपात दि.30.06.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत .
सदर बैठकींमध्ये जुनी पेन्शन हा प्रमुख मुद्दा होता , याबाबत केंद्र शासनांच्या निर्णयानंतर राज्य शासनांकडून निर्णय घेण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे , तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी वाढविणे ( सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे ) बाबतचा प्रस्ताव राज्य शासनांच्या विचाराधीन असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर पती – पत्नी एकत्रिकरण करण्यासाठीचा महसूल विभाग वाटप अधिनियमामधील तरतुदींचे पुनर्विलोकन करुन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले असून याबाबत पुढील 3 महिन्यांत निर्णय घेण्यात येणार आहे .तसेच सेवा ज्येष्ठता याद्या विहीत कालावधीत प्रसिद्ध करण्यासाठी नियमानुसार सामान्य प्रशासन विभागाने सुचना निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत , तसेच आवश्यकतेनुसार विभाग निहाय बैठका आयोजित करण्यात येणार आहेत .
तसेच महिला अधिकारी – कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या ठिकाणी सुयोग्य सोयीसुविधा उपलब्ध व्हावी यासाठी नव्याने महिला व बालविकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येणार आहेत .तसेच राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या गट विमा हप्त्यांमध्ये सातव्या वेतन आयोगाशी सुसंगत सुधारणा करण्याचा प्रस्ताव , तसेच वय 80 वर्षे व तयावरील वयाच्या निवृत्तीवेतनधारकांना मिळणाऱ्या अतिरिक्त निवृत्तीवेतनाचे दर केंद्राप्रमाणे सुधारीत करणे , निवृत्तीवेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी 15 वर्षाऐवजी 12 वर्षे होणेबाबतचा प्रस्ताव राज्य शासनांच्या विचाराधीन आहे .
तसेच सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांसाठी वाहन खरेदी अग्रिमांच्या कमाल मर्यादेत वाहन खरेदी अग्रिमांच्या कमाल मर्यादेत वाढ करणे , प्रशंसनीय कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ देण्याविषयी वर्ष 2006-2008 या कालावधीतील आदेशांची अंमलबजावणी करताना संबंधितांची 6 व्या वेतन आयोगानूसार वेतन निश्चिती होणे बाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सदर बैठकीमध्ये नमुद करण्यात आले आहेत .
राज्य शासनांकडून दिनांक 30.06.2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले सविस्तर बैठकीचे इतिवृत्त डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !
- विधानसभा सार्वत्रिक निवडणुका बाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत अत्यंत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित !
- माहे डिसेंबर महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणारं हे मोठे आर्थिक लाभ ; जाणून घ्या सविस्तर !
- मतदान केंद्रावर मतदान कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना मिळणार ह्या सुविधा !