खुशखबर : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांपैकी या मागणीवर कार्यवाही सुरु ! पाहा मंत्रालयीन स्तरावरील अपडेट !

Spread the love

Live Marathipepar , संगिता पवार  प्रतिनिधी [ State Employee Demand ] : राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत . यापैकी राज्य शासनांकडून सर्वच मागणीवर तोडगा काढण्यात येणार नसुन ज्या मागण्या पुर्ण केल्या जावू शकतील अशा मागणींवर मंत्रालयीन स्तरावर एक समिती गठीत करुन प्रश्न सोडविण्यात येणार आहेत .कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीपैकी कोणकोणत्या मागणीवर सध्य स्थितीत प्रस्ताव विचाराधीन आहेत ते पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील वर्ग 3 कर्मचारी संघटना , वर्ग चार कर्मचारी संघटना तसेच  राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदानिधाकाऱ्यांसोबत नुकतेच दि.06 नोव्हेंबर 2023 रोजी बैठक संपन्न झालेली आहे . यांमध्ये कर्मचारी संघटनांकडून एकुण 31 प्रलंबित मागणी चर्चेस उपस्थित केल्या , यांमध्ये ज्या मागणीवर सध्य स्थितीमध्ये प्रस्ताव विचाराधीन आहेत अशा मागण्या खालीलप्रमाणे पाहुयात ..

राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र शासन तसेच इतर 25 राज्य सरकार प्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत प्रस्ताव विचाराधीन आहे . तसेच माहे जुलै 2023 पासुन केंद्र सरकारप्रमाणे वाढीव चार टक्के डी.ए बाबत अधिकृत्त शासन निर्णय या महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित करण्यात येणार आहेत . तसेच प्रशंसनीय कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ देणे बाबत , सन 2006-08 या कालावधीमधील आदेशांची अंमलबजावणी करताना संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती होणेकरीता मा. न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरु करण्यात येत आहेत .

त्याचबरोबर सन 2016 पुर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र सरकार प्रमाणे काल्पनिक वेतननिश्चिती करुन सातव्या वेतन आयोग प्रमाणे सुधारणा करण्याची कार्यवाही मंत्रालयीन स्तरावर करण्यात येत आहेत . त्याचबरोबर पदोन्नतीच्या साखळ्या उपलब्ध नसल्याने , सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील ग्रेड पे ची एस – 20 मयादा काढण्याची कार्यवाही मंत्रालयीन स्तरावर सुरु करण्यात येत आहेत .

तसेच शासकीय सेवेत कार्यरत असणारे पती – पत्नी एकत्रिकरण धोरण नुसार महसुल विभाग वाटप नियम 2021 च्या अधिसुचना नुसार सुधारणा करणेबाबतच्या प्रस्तावर सध्य स्थितीमध्ये मंत्रालयीन स्तरावर कार्यवाही सुरु आहे.प्रलंबित मागणीपैकी वरील मागणींवर मंत्रालयीन स्तरावर कार्यवाही सुरु करण्यात येत असल्याबाबत राज्याचे मुख्य सचिव यांनी बैठकी दरम्यान माहिती दिली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment