Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee December payment anudan gr ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर महिन्यांचे वेतन करीता निधीचे वितरण करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या निर्णयानुसार , सन 2024-25 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित करण्यात व वित्त विभाग मार्फत बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नमुद नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहेत .
यांमध्ये सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , समग्र शिक्षा अभियान , तसेच जनजाती क्षेत्र उपयोजना , समग्र शिक्षा अभियान , अनुसुचित जातीसाठी विशेष घटक योजना , सचिवालय – सामाजिक सेवा , सचिवालय , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग ,तसेच क्रिडा व युवक सेवा , खेळाडुंना शिष्यवृत्या व पुरस्कार , ऑलिम्पिक ,राष्ट्रकुल व आशियाई खेळांमध्ये पदके मिळविणाऱ्या क्रिडापटुंना रोख पारितोषिके आदि लेखाशिर्षांखाली निधींचे वितरण करण्यास मंजूरी देण्यात येत आहेत .
तसेच यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय / शासन परिपत्रक यांमधील विहीत सुचना / अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम 1959 मधील परिशिष्ट – 26 तरतुदी विचारात घेवून संबंधितांना अनज्ञेय असणाऱ्या किमान रक्कमेच्या मर्यादेत अग्रिम मंजुर करण्यात येत आहेत .
तसेच सदरचा निधी हा शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतनेत्तर , सहायक अनुदाने करीता खर्च करण्यात यावा असे नमुद करण्यात आलेले आहेत . या संदर्भातील निधी वितरणाचा सविस्तर सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .