Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee December month payment update] : कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर 2024 चे नियमित वेतन अदा करणे संदर्भात महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे , सदर महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला आहे .
सदर जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार , DDO 1 (मुख्याध्यापक) यांनी DDO – 2 कडे देयके फॉरवर्ड करण्यासाठी दिनांक 16 डिसेंबर पर्यंत मुदत आहे , तर DDO 2 ने शालार्थ प्रणालीतून देयके DDO 3 कडे फॉरवर्ड करण्यासाठी दिनांक 19 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे .
तर संकलित नमुना Detail abstract Report ची प्रिंट ,GPF Sedule व ई कुबेर खाते पडताळणी प्रमाणपत्र याप्रमाणे तयार करुन पंचायत समिती स. ले. अधिकारी यांची प्रति स्वाक्षरीसह शिक्षण विभाग जिल्हा परिषद लेखा विभागास प्रत्यक्ष सादर करण्याची शेवटची मुदत 20 डिसेंबर 2024 अशी असणार आहे .

सदर देयके सादर करीत असताना , कर्मचाऱ्यांचे बँक खाते , आयएफसी (IFSC) कोड तपासून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे , तर ज्या कर्मचाऱ्यांना प्राण (PRAN ) नंबर मिळालेले आहेत , त्यांच्या वेतनातून दरमहा नियमित NPS रक्कम कपात करण्याचे निर्देश दिले आहेत . तर जे कर्मचारी या महिन्यांमध्ये निवृत्त होत असतील , अशा कर्मचाऱ्यांची NPS वर्गणी व शासन हिश्याची रक्कम कपात करण्यात येवू नये असे , नमूद करण्यात आले आहेत .
तसेच ज्या कर्मचाऱ्यांची जीपीएफ कपात आहे , अशा कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीपूर्वी तीन महिने जीपीएफ कपात बंद करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत . नियमित वेतनासाठी वरील वेळापत्रकानुसार देयके सादर करणे आवश्यक असणार आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.