Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee December 2023 to Jan. 2024 Payment Anudan Shasan Nirnay ] : सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी वेतन व वेतन बाबीकरीता अनुदान वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या अल्पसंख्याक विकास विभागांकडून दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग , मुंबई या कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांचे माहे डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 चे वेतन व वेतनावरील बाबीकरीता अनुदान उपलब्ध करुन देणेबाबत अल्पसंख्याक आयोगाच्या दिनांक 01.12.2023 च्या पत्र व सहपत्रानुसार शासनांस विनंती करण्यात आलेली होती , त्यानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीत निधीपैकी बीम्स प्रणालीवरील उपलब्ध निधीमधून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांचे माहे डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 चे वेतन व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती ..
यानुसार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग , मुंबई या कार्यालयासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये 2235 , सामाजिक सुरक्षा व कल्याण , 02 समाज कल्याण , 200 इतर कार्यक्रम 01 , 16 राज्य अल्पसंख्याक आयोग 2235 ए 249 , 36 सहायक अनुदाने ( वेतन ) या लेखाशिर्षांअंतर्गत एकुण रुपये 92,09,000/- इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे .
वित्त विभाग , शासन परिपत्रक दिनांक 12 एप्रिल 2023 मधील मार्गदर्शक सूचनांनुसार सद्यस्थितीत वेतन या बाबीकरीता एकुण अर्थसंकल्पीत निधीच्या 80 टक्के च्या मर्यादेत म्हणजेच एकुण 73,67,200/- इतका निधी बिम्स प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे . त्यापैकी दिनांक 21.04.2023 रोजीच्या संदर्भाधिन निर्णयानुसार , रुपये 9,20,900/- रुपये , दिनांक 04.05.2023 नुसार 9,20,900/- रुपये , दिनांक 28.06.2023 नुसार 3,68,360/- रुपये , तर दिनांक 01 मे 2023 नुसार 14,46,367/- रुपये असे एकुण 51,57,040/- रुपये इतके अनुदान आयोगास वितरीत करण्यात आलेले आहेत .
या संदर्भात निधींचा तपशिलवार विवरण पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
या संदर्भात राज्य शासनांच्या अल्पसंख्याक विकास विभागांकडून दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.