Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State ZP Employee Darjavadh Vetanshreni , Court Result ] : राज्यातील तब्बल 38,000 कर्मचाऱ्यांना दर्जावाढ वेतनश्रेणी कायम करण्यास , न्यायालयाकडून मान्यता देण्यात आलेली आहे . हा न्यायालयाचा निर्णय राज्यातील तब्बल 38,000 कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे , सविस्तर न्यायालयाचा निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत इयत्ता 6 वी ते 8 वी पर्यंत वर्गाकरीता सन 2014 पासून नियुक्त असणाऱ्या पदवीधर शिक्षकांना देण्यात आलेली वेतोन्नत ( दर्जावाढ ) वेतनश्रेणी रद्द करण्यात आलेली होती , त्याऐवजी सदर पदवीधर शिक्षकांना सहशिक्षक वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली होती . व होणाऱ्या मागील ज्यादा ( अतिरिक्त ) वेतनाची वसुली करण्यात येत होत्या . वसुली करणे संदर्भात अधिकृत्त परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी मार्फत दिनांक 10.06.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेले होते .
या आदेशाच्या विरुद्धात पदवीधर शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या . सदरच्या याचिकेवर मा.न्यायमुर्ती रविंद्र घुगे आणि वाय. खोब्रागडे या द्विस्तरीय खंडपीठाने दिलासादायक निर्णय देत , पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी ( दर्जावाढ वेतनश्रेणी ) रद्द करुन वसुली करणेबाबतचा मुख्य कार्यकारी अधिकारांचा आदेश रद्द करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तर दिनांक 10.06.2022 पुर्वीची स्थिती कायम ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत , त्याचबरोबर राज्यतील सर्वच पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी लागु करता येईल यारकीात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल देण्यात यावेत . व राज्य शासनांकडून त्यावर माहे मे 2024 पर्यंत अधिकृत्त निर्णय घेण्याचे आदेश देखिल न्यायालयाने दिले आहेत .
सदर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परिपत्रकांनुसार राज्यातील पालघर , संभाजीनगर सह राज्यात अनेक जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांच्या दर्जावाढ वेतनश्रेणी रद्द करण्यात आलेल्या होत्या . यामुळे शिक्षक नेते तसेच याचिकाकर्ते श्री.शिवाजी खुडे यांनी राज्यातील तब्बल 38,000 शिक्षक कर्मचाऱ्यांना न्यायालयीन लढाई लढून न्याय मिळवून दिला आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.