राज्यातील रोजंदारी / कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करणेबाबत अखेर राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.31.08.2023

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील रोजंदारी / कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना राज्य शासन सेवेत नियमित करणेबाबर राज्य शासनांच्या नगर विकास विभागांकडून दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयान्वये शासन निर्णयांमध्ये नमुद रोजंदारी / कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमित करण्यात आलेल्या आहेत .

यापुर्वी आदिवासी विकास विभागाकडून शासकीय आश्रमशाळा / वसतिगृहांमध्ये 10 वर्षांपेक्षा अधिक वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात आलेले आहेत . यानुसार आता राज्यातील विविध नगरपरिषांदामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करुन त्यांचे समावेशन करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार 8 कनिष्ठ अभियंता यांना राज्यातील नगरपरिषदामधील कनिष्ठ अभियंता या पदासाठी निश्चित करण्यात आलेल्या सेवाप्रवेश नियमानुसार नगरपरिषदांच्या पात्र कर्मचाऱ्यांमधून भरण्यात येणाऱ्या 25 टक्के पदांपैकी सध्या रिक्त असलेल्या पदांवर त्यांची नियुक्ती करण्यात यावी असे नमुद करण्यात आलेले आहेत .

तसेच सदर अभियंते कार्यरत असणारी पदे ही राज्य संवर्गातील असल्याने राज्यात रिक्त पदे असतील तिथे त्यांना रुजु व्हावे लागणार आहे व ते बदलीस पात्र असणार आहेत . ही बाब सदर अभियंत्यांच्या निदर्शनास आणून त्यांची लेखी सहमती घेवून नियमितीकरणाची कार्यवाही नगरपालिका प्रशासन संचालनालय , बेलापूर नवी मुंबई यांनी करावी लागणार आहे .

तसेच सदर अभियंत्यांच्या  प्रथम नियुक्तीपासूनची सेवा केवळ सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत , तसेच त्या दिवशी नियुक्ती झाली असे समजूर त्यांची वेतन निश्चिती करण्यात यावी त्याचबरोर नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने सदरच्या 8 कनिष्ठ अभियंत्यांच्या नियमितीकरणाचे आदेश निर्गमित करुन सदरचे आदेश दिनांक 10/12/2021 पासून लागू झाल्याचे त्यांमध्ये नमुद करण्यात यावे असे नमुद करण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील नगर विकास विभागांकडून दिनांक 31.08.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment