Good News : राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 4% वाढ संदर्भात शासन निर्णय तयार – वित्त विभाग !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee DA Vadh News ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे डी.ए वाढ लागु करणेबाबत आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे . महागाई भत्ता वाढीचा अधिकृत्त शासन निर्णय वित्त विभागांकडून तयार करण्यात आला असून , सदर शासन निर्णय पुढील आठवड्यापर्यंत केला जाईल .

नोव्हेंबर पेड इन डिसेंबर मध्ये मिळणार वाढीव डी.ए : नोव्हेंबर पेड इन डिसेंबर महिन्यांच्या वेतन देयकासोबत वाढीव महागाई भत्ता अदा केला जाणार आहे , याकरीता माहे नोव्हेंबर महिन्यांच्या 30 तारखेपर्यंत वाढीव 4 टक्के डीएचा अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित केला जाणार असल्याची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे .

महागाई भत्ता थकबाकी : सदरचा वाढीव डी.ए हा जुलै 2023 पासून लागु करण्यात येणार असल्याने माहे जुलै , ऑगस्ट , सप्टेंबर , ऑक्टोंबर या चार महिन्यातील वाढीव चार टक्के डी.ए थकबाकीची रक्कम ही माहे नोव्हेंबर महिन्यांच्या वेतन देयकासोबत रोखीन अदा करण्यात येणार आहेत तर पेन्शनधारकांना वाढीव डी.ए , डी.ए फरकासह नोव्हेंबरच्या पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येईल .

वित्त विभाग शासन निर्णय : सातव्या वेतन आयोगांनुसार वेतन धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 4 टक्के डी.ए तर सहाव्या वेतन आयोगांनुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना 09 टक्के वाढ लागु करण्यात येणार आहेत , याबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय ( GR ) वित्त विभागाकडून तयार करण्यात आलेला असून , दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत अधिकृत्त शासन निर्णय संकेतस्थळावर निर्गमित करण्यात येईल .

सदरच्या डी.ए वाढीमुळे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात तर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे .

4% DA वाढ शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment