Live Marathipepar बालाजी पवार प्रतिनिधी [ State Employee DA INCREASE GR ] : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 01 जुलै 2023 पासून सुधारणा करणे बाबत , राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून आज दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी अखेर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्ताच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न राज्य शासनाच्या विचाराधीन होता , यानुसार आता राज्य शासन असे आदेश देत आहे की , दिनांक 01 जुलै 2023 पासून सातव्या (7व्या ) वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 42 टक्के भरून 46% करण्यात येत आहे .
सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 01 जुलै 2023 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीतील महागाई भत्ता थकबाकीसह (DA फरक ) माहे नोव्हेंबर 2023 च्या वेतनासोबत रोखीने देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्या प्रकारेच यापुढे लागू असणार आहेत .
यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांची वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्याच लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहे . तसेच मंजूर अनुदानातून सदर खर्च भागवण्यात यावेत असे सूचना देण्यात आली आहेत . त्याचबरोबर अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखाली त्यांच्या लेखा शेषाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाचा बाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्याची निर्देश देण्यात आली आहेत
सदर वाढीव महागाई भत्ता बाबतचा वित्त विभागाकडून दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय खालील प्रमाणे पाहू शकता..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.