लाईव्ह मराठी पेपर , प्रणित पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सर्वच कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासुन महागाई भत्तांमध्ये वाढ करणेाबाबत राज्य शासनांकडून अखेर दिनांक 30.06.2023 रोजी जी.आर निर्गमित करण्यात आला आहे . आपल्या संकेतस्थळावर यापुर्वीच स्पष्ट करण्यात आले होते कि , डी.ए वाढीबाबत दोन दिवसांमध्ये शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल .
वित्त विभागांकडून अखेर महागाई भत्ता वाढी संदर्भात आज दिनांक 30.06.2023 रोजी GR निर्गमित करण्यात आला असून सदर शासन निर्णयान्वये सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासुन 4 टक्के महागाई भत्ता वाढ , डी.ए फरकासह जुन महिन्यांच्या वेतन देयकासोबत रोखीने अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
तर सहाव्या वेतन आयोगांनुसार वेतन घेणाऱ्या राज्य कर्मचारी यांना माहे जानेवारी 2023 पासुन डी.ए मध्ये सुधारणा करुन 9 टक्के वाढ करण्यात आलेली आहे , म्हणजेच यापुर्वी सदर कर्मचाऱ्यांना 212 टक्के प्रमाणे डी.ए मिळत होता , आता सदर शासन निर्णयानुसार आता माहे जानेवारी 2023 पासून 221 टक्के ( 9 टक्के वाढ ) प्रमाणे डी.ए थकबाकीसह माहे जुन महिन्यांच्या वेतन देयकासोबत रोखीने देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
यामुळै आता राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना महिना अखेर राज्य शासनांकडून डी.ए वाढीची मोठी भेट देण्यात आलेली आहे .
आपण जर शासकिय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर ,Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !