लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : केंद्र सरकारने जानेवारी 2023 पासून डी.ए मध्ये चार टक्के वाढीच्या घोषणानंतर देशांमध्ये तामिळनाडु , उत्तर प्रदेश , बिहार , हिमाचल प्रदेश , आसाम , राजस्थान राज्य सरकारने डी.ए वाढीची घोषणा करण्यात आलेली आहे . ही डी.ए वाढ माहे जानेवारी 2023 मधील असून सदर डी.ए वाढीबाबत , इतर राज्य सरकारकडून देखिल प्रस्ताव तयार करुन मंजुरी देण्यात येत आहेत .
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मुळ वेतनाच्या आधारावर देण्यात येत असतो . यामुळे डी.ए वाढीमुळे निश्चितच कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होत असते . केंद्र सरकारच्या धर्तीवर 4 टक्के डी.ए वाढीची घोषणा इतर राज्य सरकारकडून करण्यात येत आहेत ,महाराष्ट्र राज्य सरकारने देखिल राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांना डी.ए वाढीची घोषणा केली असून लवकरच इतर सर्व कर्मचाऱ्यांना 4 डी.ए वाढ लागु करणेबाबत अधिकृत्त घोषणा करण्यात येणार आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना 4% DA वाढीबाबत कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन !
उत्तराखंड राज्य कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 4 टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंजुरी दिली आहे . यामुळे आता छत्तीसगढ राज्य शासन सेवेतील तब्बल 3 लाख सरकारी कर्मचारी व पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना 4 टक्के डी.ए वाढीचा लाभ मिळणार आहे .डी.ए वाढीच्या अध्यादेश जारी केल्यामुळे , छत्तीसगढ राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए हा 38 टक्के वरुन 42 टक्के वर जावून पोहोचला आहे .
सदरची डी.ए वाढ ही जानेवारी 2023 पासून डी.ए फरकासह माहे मे महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत रोखीन अदा करणेबाबत छत्तीगढ राज्य सरकारकडून अध्यादेश जारी करण्यात आलेला आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे .
सरकारी कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !