लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील कार्यरत शासकीय कर्मचारी , निमशासकीय कर्मचारी ( जिल्हा परिषद ) , अनुदानित शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतन धारक यांची बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारी महागाई भत्ता वाढीची प्रतिक्षा अखेर संपली आहे . राज्य शासनांकडून महागाई भत्ता वाढी संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .
महागाई भत्ता ( DA ) वाढ संदर्भात मंत्रालयीन हालचाली : राज्य शासन सेवेतील वरील नमुद सर्व कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के महागाई भत्ता ( DA ) लागु करणे संदर्भात राज्य शासनांकडून मंत्रालयीन स्तरावर आवश्यक असणारी प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असल्याची माहीती सुत्रांनुसार समोर येत आहे .
राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के म्हणजेच एकुण 42 टक्के दराने महागाई भत्ता माहे जानेवारी 2023 पासून रोखीन लागु करण्यात येणार आहे , यामुळे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मे महिना या पाच महिन्यातील डी.फरकाचा लाभ माहे जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे .
हे पण वाचा : राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची होणार तपासणी , जाणुन घ्या आत्ताची नविन अपडेट !
महागाई भत्ता वाढीसंदर्भात वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून , सदर डी.ए वाढीच्या प्रस्तावास पुढील आठवड्यात मान्यता दिली जाणार असून , 4 टक्के डी.ए वाढीसंदर्भात अधिकृत्त शासन निर्णय जून महिना अखेर निर्गमित करण्यात येणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर येत आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !