Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee da thakabaki paripatrak ] : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन वाढीव 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे . सदर डी.ए वाढ माहे जुलै महिन्यांच्या वेतन देयकासोबत डी.ए फरकासह अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी यांना डी. ए थकबाकीची रक्कम अदा करणेबाबत राज्य शासनांच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक ( सर्व ) , शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) जिल्हा परिषद ( सर्व ) तसेच अधिक्षक वेतन व भ.नि.नि.पथक ( प्राथमिक ) सर्व यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत .

सुधारित वेतन संचरनेत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत ( सहाव्या वेतन आयोगानुसार ) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्याच्या दरात दिनांक 01 जानेवारी 2024 पासून सुधारणा करण्याबाबत व अनुज्ञेय महागाई भत्याची थकबाकी देणेबाबत ..

शिक्षण विभागाच्या पत्र क्र.2499 अर्थसंकल्प दिनांक 12 जुलै 2024 व मा.शिक्षण आयुक्त यांच्या दिनांक 15 जुलै 2024 रोजीच्या संदर्भिय पत्र / निर्देशानुसार डी.ए थकबाकी अदा करणेबाबत तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत शिक्षण संचालनालय ( प्राथमिक ) कार्यालयास अवगत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 16.07.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *