Live marathipepar , संगीता पवार प्रतिनिधी [ State employee Demand ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव महागाई भत्ता , वाहतूक भत्ता , त्याचबरोबर सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे आदि मागणीवर दिनांक 06 नोव्हेंबर 2023 रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत .
DA 4% वाढ : वाढीव महागाई भत्ता (DA ) केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2023 पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे . त्याच धर्तीवर राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जुलै 2023 पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करणे संदर्भात लवकरच कार्यवाही करण्यात येईल , असे राज्याचे मुख्य सचिव यांनी सांगितले आहेत .
वाहतूक भत्ता ( TA ) : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुधारित वाढीव दराने वाहतूक भत्ता लागू करण्यात आला आहे , यासंदर्भात राज्य शासनाकडून प्रस्ताव तपासून सादर करण्याची निर्देश देण्यात आले आहेत .
सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष (Retirement Age 60 Year ) : राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे संदर्भात , बऱ्याच दिवसापासून मागणी प्रलंबित आहे . या संदर्भात राज्य शासनाकडून प्रस्ताव प्रस्तावित असल्याचे नमूद करण्यात आले आहे . यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे यावेळी माननीय मुख्य सचिव यांनी बैठकीमध्ये नमूद केले आहे.
यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मागणीवर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्यात येणार आहे , ज्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना आर्थिक व सेवेचा मोठा लाभ प्राप्त होणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.