Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली ,अहेरी व गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदशील पोलीस ठाणे ,पोलीस उपठाणी आणि सशस्त्र दुरक्षेत्रे व कार्यालय येथे व अति संवेदलनशील क्षेत्रात कार्यरत विविध शाखांचे पोलीस अधिकारी /कर्मचारी यांना अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता देणे संदर्भात राज्य शासनाच्या गृह विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 20 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

नक्षलग्रस्त गडचिरोली, अहेरी व गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी/ कर्मचारी यांना अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने मूळ वेतन व महागाई भत्ता देण्यात यावा, त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील उद्देशिकेतील अनुक्रमांक (चार )येथील दिनांक 18 फेब्रुवारी 2011 च्या शासन निर्णय निश्चित करण्यात आलेले आहे .पोलीस ठाणे पोलीस उपठाणी , सशस्त्र दुरक्षेत्रे व कार्यालयामध्ये कार्यरत असलेले अखिल भारतीय सेवेतील अधिकारी व राज्यसेवेतील अधिकारी /कर्मचारी यांना अनुज्ञेय असलेल्या मूळ वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता देण्यात यावा असा निर्णय देण्यात आला आहे .

DA वाढ बाबत शासन निर्णय पाहा

त्याचबरोबर राज्य गुप्तचर वार्ता विभागाचे अधिकारी / कर्मचारी यांना एकस्तर पदोन्नतीचा लाभ ते राज्यात कोठेही कार्यरत असले तरी अनुज्ञेय असणार आहे . त्याचबरोबर गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात काम करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना कामाचे स्वरूप अत्यंत जोखमीचे असल्याने , या जिल्ह्यात असंवेदनशील भागात कार्यरत असलेल्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अधिकारी / कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने एकस्तर पद्धतीचा लाभ किंवा अतिसंवेदनशील पोलीस ठाणे , पोलीस उपठाणी आणि सशस्त्र दुरक्षेत्रे येथे कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांप्रमाणे देय वेतनाच्या दीडपट दराने वेतन अधिक महागाई भत्ता यापैकी जे जास्त असेल ते देण्यात येण्याचे आदेश देण्यात आले आहे .

राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या गडचिरोली ,अहेरी, गोंदिया, जिल्ह्यातील संवेदनशील क्षेत्रात कार्यरत आहेत यास्तव संवेदनशील क्षेत्रात जे कार्यरत असताना त्यांनाही अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने मूळ वेतन अधिक महागाई भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस बलातील अधिकारी / कर्मचारी अतिसंवेदनशील भागात कार्यरत असतील तोवरच त्यांना दीडपट दराने महागाई भत्ता वेतन आरोग्य असणार आहे .

महागाई भत्ता वेतन दीडपट देणेबाबत शासन निर्णय पाहा ..

शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी ,शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *