लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व सरकारी कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे . ती म्हणजे माहे जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत डी.ए वाढीसह इतर दोन मोठे लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत , या संदर्भात राज्य शासनांकडून शासन निर्णय देखिल निर्गमित करण्यात आलेला आहे .
महागाई भत्ता 4 टक्के वाढ – राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व पात्र कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के डी.ए माहे जानेवारी 2023 पासून डी.ए फरकासह लागु करण्यात येणार आहेत . सदरची वाढ प्रत्यक्ष जानेवारी महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत लागु करण्यात येणार असल्याची माहीती समोर येत आहे . यामुळे कर्मचाऱ्यांचा ( State Employee ) एकुण महागाई भत्ता ( DA ) हा 42 टक्के वर जावून पोहोचणार आहे .
सातवा वेतन आयोग थकबाकीचा 4 था हप्ता – राज्य शासन सेवेतील सरकारी / पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग ( 7 th Pay Commission ) फरकाचा चौथा हप्ता माहे जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येणार असल्याचे अधिकृत्त शासन निर्णय राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.24 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर थकबाकी फरकाची रक्कम भविष्य निर्वाह निधी योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना खात्यात व्याजासह जमा करण्यात येणार आहेत . तर राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) धारकांना व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
हे पण वाचा : या पाच छोट्या योजने मध्ये करा गुंतवणूक , होईल मोठा फायदा !
जुनी पेन्शन योजना ( Old Pension Scheme ) : महाराष्ट्र राज्यातील सन 2005 नंतर सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे लाभ लागु करणेबाबत , राज्य शासनांकडून गठित अभ्यास समितीचा अहवाल दिनांक 14 जून 2023 पर्यंत राज्य शासनांकडून सादर करण्यात येणार आहे . यावर राज्य शासनांकडून सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याने , राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीसह सातवा वेतन आयोग थकबाकीचा चौथा हप्ताची रक्कम व जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करणारी पेन्शन योजना लागु करण्यात येणार आहे .
आपण जर सरकारी – निमसरकारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !