Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee da increase update ] :  राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करणे संदर्भातील निर्णय हिवाळी अधिवेशन दरम्यान घेण्यात येणार असल्याची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे .

विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर , हिवाळी अधिवेशनाची चाहूल लागलेली आहे . तर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर , त्यांनी हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर केलेली आहे . हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूर येथे होते , दरम्यानच्या कालावधीत राज्यातील विविध प्रश्नावर तोडगा काढण्यात येत असतो .

दिनांक 16 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे . हे अधिवेशन एक आठवडाभर राहील , दरम्यान विविध प्रश्नावर चर्चा केली जाईल . याकरिता सध्या मंत्रिमंडळ स्थापनेकडे राज्याचे मुख्यमंत्री गुंतले आहेत . पहिल्या मंत्रिमंडळ स्थापनेनंतरच हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे .

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार : राज्यामध्ये मागील तीन महिन्यापासून विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरू असल्याने , कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असणारा महागाई भत्ता  (DA) बाबत निर्णय झालेला नाही . सदर हिवाळी अधिवेशनामध्ये वित्त विभागाकडून , तीन टक्के DA वाढीचा प्रस्ताव मांडण्यात येईल . तर अधिवेशनात सदर प्रस्तावाला मंजुरीनंतर माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतनासोबत वाढीव महागाई भत्ताचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्यात येईल .

सदरचा DA वाढ ही माहे जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार  आहे , यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 50% वरून 53% इतका होणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *