राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 3% महागाई भत्ताचा लाभ जानेवारी वेतन / पेन्शन देयकासोबत ..

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee da increase in December paid in January payment ] : राज्य शासकीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना केंद्र सरकाच्या धर्तीवर वाढी 3 टक्के महागाई भत्ताचा लाभ अदा करणेबाबत , अधिवेशनांमध्ये मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची मोठी महत्वपुर्ण माहिती समोर येत आहेत .

यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना माहे 01 जुलै 2024 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने डी.ए चा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे . म्हणजेच एकुण डी.ए हा 50 टक्के वरुन 53 टक्के इतका होणार आहे .

डी.ए फरकाची रक्कम मिळणार : तर दिनांक 01 जुलै पासुनची डी.ए फरकाची रक्कम माहे डिसेंबर वेतन देयकासोबत अदा करण्यात येणार आहे . याकरीता राज्य शासनांच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून , अधिवेशन दरम्यान सदर प्रस्तावावर मंजूरी मिळण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे .

सदर वाढीव डी.ए चा लाभ हा राज्यातील शासकीय कर्मचारी , पेन्शनधारक , तसेच जिल्हा परिषदा कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहेत .

अधिवेशनातील डी.ए वाढीच्या निर्णयानंतर , राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे .

Leave a Comment