लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र शासनाच्या सेवेत नोकरीत असताना , अनफिट कर्मचाऱ्यास शासन सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याची तरतूद आहे , परंतु आता या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या मॅटने कर्मचाऱ्यांना दिलासादायक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे ..
मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर निकाल देत शासकीय कर्मचारी सेवेमध्ये आणि अनफिट झाल्यास , सेवेतून काढता येणार नाहीत . अशा प्रकारचे आदेश राज्य शासनास दिले आहे , एखादा कर्मचारी सेवेत असताना अनफिट झाल्यास , सदर कर्मचारी सेवेत आहे , असे समजून त्या कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे सर्व लाभ देणे राज्य शासनास बंधनकारक ठरणार आहेत . अशा प्रकारचा निर्णय मुंबई मॅटचे सदस्य ए. पी. कुऱ्हेकर यांनी श्री. चनबसय्या संगमठ यांच्या प्रकरणात निर्णय दिला आहे ..
केंद्र सरकारच्या 1995 व 2016 च्या कायद्यानुसार शासन सेवेमध्ये आणि अनफिट झाल्यास , सदर कर्मचाऱ्यास नोकरीवरून काढता येत नाही . तर त्या कर्मचाऱ्यास हलकी कामे देण्याची तरतूद सदर कायद्यामध्ये करण्यात आली आहे , जर ते शक्य नसल्यास , सदर कर्मचाऱ्यास अतिरिक्त पदावर सामावून घेण्याची देखिल तरतूद करण्यात आलेली आहे ..
श्री जनबसय्या संगममठ हे सोलापूर जिल्ह्यामध्ये नायक पोलीस शिपाई या पदावर कार्यरत होते , ते खाजगी कामानिमित्त संगमठ या ठिकाणी रजेवर होते . त्यादरम्यान त्यांचा दिनांक 28 ऑक्टोबर 2022 रोजी अपघात झाला . या अपघातामध्ये त्यांची पत्नी व ते गंभीर जखमी झाले , यामुळे त्यांना काम करता येणे शक्य नसल्याने सोलापूर येथील कार्यालय प्रमुख फौजदार चवळी पोलीस ठाण्यात नेमणूक देण्यात आली . यामध्येच त्यांना पक्षघाताचा झटका आल्याने , त्यांना पोलीस कार्यालयाकडून मेडिकल बोर्डाकडे पाठवण्यात आले .
सदर मेडिकल बोर्डाने त्यांना अनफिट घोषित केल्याने , सोलापूरच्या पोलीस आयुक्तांनी त्यांना सेवेतून काढून टाकण्याचे आदेश जारी केल्याने संगमठ हे सदर निर्णयाविरुद्ध मुंबई मॅट मध्ये आव्हान केले.मुंबई उच्च न्यायलयाने संगमठ यांना दिलासा देत , सदर कर्मचारी सेवेत असल्याचे गृहीत धरून सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारी सर्व आर्थिक लाभ देण्याचे आदेश देण्यात आली आहे . यामुळे सेवेत असताना अनफिट होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !