लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : राज्य शासनांकडून शासकीय कर्मचाऱ्यांना विविध अग्रिमे मंजुर करण्यात येत असताना , दिवाळी सणाच्या औचित्य साधून सण अग्रिम , मोटर सायकल / कार खरेदी कर्मचारी मोटार खरेदी अग्रिमे मंजुर करण्यात येत असतात .त्याचबरोबर संगणक खरेदी करण्यासाठी देखिल राज्य शासनांकडून अग्रिम मंजुर करण्यात येत असते , संगणक खरेदी अग्रिम मंजुर करणेबाबत राज्य शासनांच्या विध व न्याय विभागांकडून दि.30.05.2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजांमध्ये संगणकाचा वापर व्हावा , तसेच नविन तंत्रज्ञानाचा वापर व्हावा याकरीता संगणक खरेदी करण्यासाठी राज्य शासनांकडून राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना संगणक अग्रिम मंजुर करण्यात येतात .सदर अग्रिमचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनांकडून काही अटी / शर्ती देण्यात आलेल्या आहेत , सविस्तर अटी / शर्ती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
राज्य कर्मचाऱ्यांना संगणक खरेदी अग्रिमे मंजुर करत असताना , सदर अधिकारी / कर्मचारी यांचा सेवानिवृत्तीचा दिनांक लक्षात घेवून धन मंजुरीचे आदेश काढण्यात येतील .तसेच सदर मंजुर करण्यात आलेली रक्कम ही संगणकाची किंमत पेक्षा अधिक असू नये तसे प्रमाणपत्र देणे आवश्यक असणार आहे . ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या नावे हे अग्रिमे मंजुर करण्यात आलेले आहेत , फक्त त्याच कर्मचाऱ्यांच्या नावे अग्रिम देय असणार आहेत .
संगणक अग्रिमाचा लाभ घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांमध्ये अग्रिम घेतल्याची नोंद घेणे आवश्यक असणार आहे .अग्रिमांची मंजुर झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या जर बदली झाली असल्यास , सबंधित कार्यालय प्रमुखांकडून पुढील कार्यवाही करण्यात येईल .शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना वित्त विभाग दि.03.02.2012 च्या शासन निर्णयानुसार वैयक्तिक संगणक / लॅपटॉप / टॅबलेट संगणक खरेदी करण्यासाठी 20,000/- रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात येते .
या संदर्भात विधी व न्याय विभागांकडून दि.30.05.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर , शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
आपण जर शासकीय , निमशासकीय , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी ,पेन्शनधारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !