Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee IMP shasan paripatrak ] : सेवानिवृत्त झालेल्या व सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या ( सेवा निवृत्तीस 1 वर्षे राहिलेल्या ) वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांमध्ये अतिप्रदानाची वसुली करण्यात येवू नये संदर्भात राज्य शासंनाच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 10.08.2020 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सेवानिवृत्त झालेल्य व सेवानिवृततीच्या उंबरठ्यावर असलेल्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांमध्ये अतिप्रदानाची वसूली पुढीलप्रमाणे दिेलेल्या अभिप्रायानुसार करण्यात येवू नयेत असे नमुद करण्यात आलेले आहेत .
अ)यांमध्ये सेवानिवृत्त वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना करण्यात आलेल्या अतिप्रदानाची वसूली करण्यात येवू नयेत असे नमुद करण्यात आलेले आहेत . ब) तसेच निवृत्तीच्या उंबरठ्यांवर असणाऱ्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांकडून अतिप्रदानाची वसूली करण्यात येवू नयेत असे नमुद आहे . क ) तसेच पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी अतिप्रदान करण्यात आले असल्यास वसूल करण्यात येवू नयेत .
ड) तसेच चुकीने लाभ देण्यात आले असल्यास चुकीची दुरुस्ती करता येईल . इ) तसेच दिनांक 28 जुलै 2014 चे परिपत्रक भावी ( Prospective ) प्रभावाने लागू करणे योग्य व न्यायोचित होणार नाहीत , असे नमुद करण्यात आलेले आहेत . सदरचा परिपत्रक हे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना लागू करण्यात आलेले आहेत .
परंतु काही जिल्हा परिषदा शासनाच्या स्वयंस्पष्ट परिपत्रकानुसार कार्यवाही न करता सदर शासन परिपत्रातील नमुद तरतुदीनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश अवर सचिव , महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.