राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.10 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 04 महत्त्वपूर्ण निर्णय !

Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee cabinet nirnay dated 10 October ] : दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती . सदर बैठकीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत , सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

न्यायमूर्ती यांच्या खाजगी सचिवांना सचिवालयीन संवर्ग : राज्यातील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या खाजगी सचिव तसेच खाजगी सचिव आणि स्वीय सहाय्यक यांची संरचना सचिवालयीन संरचनेसारखी करण्याचा मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे , याचा 330 जणांना लाभ मिळणार आहे .

शिक्षकांच्या मानधनांमध्ये वाढ : राज्यातील मदरशामधील डी.एड तसेच बीएड शिक्षकांना देण्यात येणाऱ्या मानधनामध्ये मोठी वाढ करणे संदर्भात मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . सदर डी.एड धारक शिक्षकांना सद्यस्थितीत  6000/-  रुपये इतके मानधन देण्यात येते . त्यांना आता 16 हजार रुपये इतके मानधन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे . तर बी.ए बीएड , बी.एस्सी बी.एड शिक्षकांच्या मानधनामध्ये 8000/-  रुपयांवरून 18,000/- रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे .

शाळांना वाढीव अनुदान : राज्यातील शासनमान्य खाजगी अंशतः  अनुदानित शाळांना आता 20 टक्के अनुदानाचा टप्पा वाढीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . सदर निर्णयाचा फायदा राज्यातील 820 प्राथमिक शाळा तर 3513 वर्ग तुकड्या व त्या मधील तब्बल 8602 शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , त्याचबरोबर 1,984 माध्यमिक शाळा , तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील 3,043 वर्ग तुकड्या मधील 16,932 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सदर वाढीव अनुदान टप्प्याचा लाभ प्राप्त करतील .

आपले सरकार केंद्र चालकांना मानधन : आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत प्रकल्प अंतर्गत केंद्र चालकांना ग्रामरोजगार सेवकांच्या धरतीवर दर महिन्याला दहा हजार रुपये इतके मानधन ग्रामपंचायतीमार्फत देण्याचा मोठा महत्त्वपूर्ण निर्णय सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment