Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee big nirnay about graduaty amount increase ] : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहे , ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दिली जाणारी सेवानिवृत्ती उपदानाच्या रक्कमेत मोठी वाढ करण्यात आली आहे .
कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास अथवा कर्मचारी नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्यास त्यास सेवानिवृत्ती उपदान दिली जाते , सदरच्या रक्कमेत मोठी वाढ लागु करण्यात आलेली आहे . यापुर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांना सदर सेवानिवृत्ती उपदानाची कमाल रक्कम 14 लाख रुपये इतकी होती .आता यांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणी नुसार , केंद्र सरकार प्रमाणे सेवानिवृत्ती उपदानाची मर्यादा 14 लाख रुपये वरुन 20 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे . या संदर्भात दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे .
या निर्णयामुळे राज्याच्या सरकारी तिजोरीवर तब्बल 100 कोटी रुपयांचा अधिकच भार पडणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत . सदर निर्णय विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . जी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी प्रलंबित होती .
सदरच्या निर्णयामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे , तर निवृत्तीच्या नंतर मोठी रक्कम प्राप्त होणार आहे . याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक १० ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.