Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee benifits after retirement graduaty ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण / दिलादायक शासन निर्णय (GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे .
केंद्र सरकार प्रमाणे राज्यातील निवृत्तीवेतनधारक त्याचबरोबर कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना सेवानिवृत्ती उपदान / मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा 14 लाख रुपये वरून 20 लाख रुपये करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती . यानुसार दिनांक 04 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये दिनांक 01 सप्टेंबर 2024 पासून सदर उपदानाची कमाल मर्यादा 20 लाख रुपये करण्याबाबत , सहमती झाली आहे .
सदर शासन निर्णय नुसार दिनांक 01 सप्टेंबर 2024 पासून सेवानिवृत्ती उपदान / मृत्यू उपदनाची कमाल मर्यादा रुपये 14 लाख रुपये वरून वीस लाख रुपये पर्यंत वाढवण्याचा मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार असाही आदेश देत आहे की , ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे , अशा मान्यता व अनुदान प्राप्त असणाऱ्या शैक्षणिक संस्था ..
कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्तीवेतनधारक यांना सदर निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू करण्याचे निर्देश देण्यात आली आहेत . त्याचबरोबर राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 248 च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की , वरील निर्णय राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवृत्तीवेतनधारक यांना देखील लागू करण्याचे निर्देश देण्यात आली आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.