Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee bemudat stike from 29 aug 2024 ] : राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्याकडून दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासुन बेमुद संप पुकारला जाणार आहे . सदरचा संप हा राज्य सरकारी – निमसरकारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती , महाराष्ट्र यांच्या वतीने पुकारण्यात आला आहे , याबाबत सदर संघटनेचे निमंत्रक तथा सरचिटणी श्री विश्वास काटकर यांच्या वतीने दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .
सदर प्रसिद्धीपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , माहे मार्च 2023 मध्ये सांप्रत राज्य शसनाने 17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांच्या 7 दिवसांच्या संपात न भुतो न भविष्यतो उद्रेक अनुभवला आहे . या नेमस्त पंरतु प्रखर असणाऱ्या आंदोलनाचा सकारात्मक विचार करुन , राज्य शासनाने कर्मचारी शिक्षकांच्या समन्वय समितीसह दिर्घ चर्चा केली . त्यावेळी खुद्द मा. मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शनप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येईल , अशी लेखी हमी दिली आहे .
त्यानंतर माहे डिसेंबर 2023 पर्यंत त्याबाबत कोणतीच सकारात्मक प्रगतीशील कार्यवाही दिसून न आल्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुन्हा दिनांक 14 डिसेंबर 2023 पासून बेमुद संपाची घोषणा केली . सदर संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनांसह पुन्हा झालेल्या चर्चेनुसार तत्कालीन अर्थसंकल्पीय अधिवेशनात , सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जाहीर केली . परंतु पुन्हा येरे माझ्या मागल्या प्रमाणे आजपर्यंत शासनाने कोणत्त्याही स्वरुपात सुधारित पेन्शन संदर्भातील शासन निर्णय अथवा अधिसूचना अद्याप पारित केलेली नाहीत .
हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांच्या 1376 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !
त्याचबरोबर केंद्र सरकार प्रमाणे सेवानिवृत्ती उपदान देणे , 12 वर्षाच्या नंतर सेवानिवृत्ती वेतन तसेच अंशराशीकरण पुनर्स्थापना करा , केंद्राप्रमाणे 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी जाहीरात / अधिसूचना द्वारे नियुक्ती प्रक्रिया सुरु झालेल्या कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागु करा , सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करा , विविध संवर्गातील रिक्त असणाऱ्या पदांवर 40 टक्के पद कायमस्वरुपी नियुक्तीद्वारे भरा , शैक्षणिक विभाग अंतर्गातील शिक्षक – कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष चर्चासत्र आयोजित करणे ,अनुकंपावरील उमेदवारांना विना अट नियुक्त्या द्या अशा प्रलंबित मागणीकरीता मा. मुख्य सचिव पातळीवर चर्चासत्र अयोजित करुन शासन निर्णय पारित केले जाईल अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले होते . परंतु या आवश्वासनाला राज्य शासनांकडून तडा दिला आहे .
यामुळे सदरची परिस्थिती लक्षात घेवून राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची संतत्प आहेत , यामुळे आता नाईलाजाने त्यांचा हा संताप दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत संप आंदोलनाचा निर्णय दिनांक 10 ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या सभेत एकमुखाने घेण्यात आला आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.