Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Ashwasit Pragati Scheme ] : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे विद्यापीठ अंतर्गत कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनांचा लाभ ( वरिष्ठ वेतनश्रेणीचा ) लाभ अनुज्ञेय करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहेत .
येत्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये , राज्यातील विद्यापीठातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवातंर्गत 10 ,20 व 30 वर्षे योजना अंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय करणे बाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे . संत गाडगेबाब अमरावती विद्यापीठ परिसरातील दृक श्राव्य सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 07 अनुकंपा नियुक्ती धारकांना आदेश देण्यात आले .
यावेळी विद्यापीठाच्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे हिताचे प्रश्न राज्य सरकारपुढे लवकरच मांडणार येणार असून , अनुकंपाचे उर्वरित आठ प्रकरणे तसेच वयोमर्यादा ओलांडलेली चार प्रकरणे विशेष बाब म्हणून विचार करुन त्यांचा मंत्रालय स्तरावर निर्णय लोकसभा निवडणुक आचार संहितापुर्वी निर्णय घेणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे .
शिवाय नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा नुसार विद्यापीठांमध्ये कार्य अधिक गतीमान करण्यात येणार असून , परीक्षा झाल्यानंतर डिजी लॉकरच्या माध्यमातुन डीजीटल स्वाक्षरीच्या माध्यमातुन पदवी प्रमाणपत्र / गुणपत्रक देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
यामुळे आता विद्यापीठातील कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी / अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या येत्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये पुर्ण करण्याचे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत .
स्त्रोस : राज्य शासनांचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय – महासंवाद संकेतस्थळ
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.