Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Ashvasit Pragati Yojana sudharana ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार लागु करण्यात आलेली आश्वासित प्रगती योजनांमध्ये सुधारणा करणेबाबत , काल दि.14.02.2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे . त्या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून प्रसिद्धी पत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतचा दिनांक 01 एप्रिल 2010 रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करणे त्याचबरोबर 7 व्या वेतन आयोगांमध्ये 03 लाभाच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या शासन निर्णय दिनांक 02 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे . दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्य मा. मंत्रीमंडळ बैठकीत वित्त विभागाच्या सदर विषयावर मा. मंत्रीमंडळाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या वित्त विभाग मार्फत दिनांक 01 एप्रिल 2010 रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार , सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत दिनांक 01 ऑक्टोंबर 2006 पासून लाभ देतांना सदर कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक अथवा तत्सम उच्च वेतन संरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदांना लाभ देण्याचे व त्या अनुषंगाने शासन निर्णयांमध्ये सुधारणा करण्यास मा.मंत्रीमंडळाकडून दिनांक 14.02.2024 रोजी मान्यता देण्यात आली आहे .
त्याचबरोबर राज्य शासनांच्या वित्त विभागाच्या दिनांक 02 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार 03 लाभांच्या ( 10 : 20 : 30 ) सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत दिनांक 01 जानेवारी 2016 पासून लाभ देताना सदर कर्मचाऱ्यांना विवक्ष्ज्ञित सेवा कालावधी नंतर देण्यात येणारी अकार्यात्मक अथवा तत्सम उच्च वेतन संरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याचे व त्या अनुषंगाने शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यास दि.14.02.2024 रोजीच्या झालेल्या मा.मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे .
मा.मंत्रीमंडळाच्या या निर्णयामुळे अंदाजे 22,79,09,116/- रुपये इतका अनावर्ती खर्च व अंदाजे 3,61,92,000/- रुपये इतका वार्षिक आवर्ती खर्च अपेक्षित असणार आहे . या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.14.02.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर प्रसिद्धी पत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.