आश्वासित प्रगती योजना लाभ : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगांमध्ये सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय करण्यात येतो . या संदर्भात राज्य शासनांच्या महसूल व वन विभागांकडून 7 व्या वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजुर करणेबाबत , महत्त्वपुर्ण शासन निर्णय दि.15 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
महसुल व वन विभागाच्या शासन आदेश समक्रमांक दि.27.02.2023 नुसार नोंदणी व मुद्रांक विभागातील सह दुय्यम निबंधक वर्ग 2 / सह जिल्हा निबंधक वर्ग – 2 या संवर्गातील अधिकाऱ्यांना सातव्या आयोगानुसार तीन लाभाच्या सुधारित आश्वासित प्रगती पहीला लाभ मंजुर करण्यात आलेला आहे . या आदेशांमध्ये आता दि.15.05.2023 रोजीच्या शासन निर्णयांनुसार सुधारणा करण्यात येत आहे .
वरील नमुद मंजुर आदेशांमध्ये वेतनश्रेणी 15,600-39100/- ग्रेड पे 5400/- या ऐवजी वेतनश्रेणी 9300-34,800/- , ग्रेड पे 5000/- अशी सुधारणा करण्यात आलेली आहे .सदर सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ हा केवळ नोंदणी व मुद्रांक विभागातील सह दुय्यम निबंधक वर्ग -2 / सह जिल्हा जिल्हा निबंधकांना लागु असणार आहे .
हे पण वाचा : राज्यातील “या” कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली मोठी वाढ , GR निर्गमित !
या संदर्भातील राज्य शासनांच्या महसूल व वन विभागांकडून दि.15.05.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ बाबतचा सविस्तर शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक – 202305151701170219 ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
राज्य / केंद्र सरकारी कर्मचारी विषयक , नोकर भरती , योजना व देश -विदेश चालु घडामोडींच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !