Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee asadharan raja shasan nirnay ] : राज्य कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजा व वेतनवाढ संदर्भातील वित्त विभाग मार्फत दिनांक 26 डिसेंबर 2011 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार , नमुद करण्यात आले आहेत कि , म.ना.सेवा ( वेतन ) नियम 1981 मधील नियम 39 नुसार समय श्रेणीतील वेतनवाढीसाठी 12 महिन्यांचा कालावधी विचारात घेण्यात येतो . तर समय श्रेणीतील वेतनवाढीकरीता हिशोबात घ्यावयाचा कालावधी पोटनियम 2 ब मध्ये नमुद करण्यात आला आहे .
त्यानुसार वैद्यकीय कारणा व्यतिरिक्त अन्य असाधारण रजा वार्षिक वेतनवाढीकरीता जमेस धरावयाच्या सेवेमध्ये हिशोबात येत नसल्याचे नमुद करण्यात आले आहेत . तसेच दि.01 जुलै रोजी कर्मचाऱ्यांना दरवर्षी एकाच दिनांकास वार्षिक वेतन मंजूर करण्याची तरतुद आहे . त्याकरीता दि.01 जुलै रोजी ज्या कर्मचाऱ्यांची सुधारित वेतन संरचनेमध्ये 6 महिने अथवा त्यापेक्षा अधिक सेवा पुर्ण होईल ते कर्मचारी …
दि.01 जुलै रोजी वेतन वाढ मिळण्यास पात्र राहतील .. तर सुधारित तरतुदीच्या अनुषंगाने वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अन्य असाधारण रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ कशाप्रकारे विनिमित करावी , याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता . या अनुषंगाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त अन्य असधारण रजेच्या अनुषंगाने वार्षिक वेतनवाढ पुढील नियमांचे पालन करुन मंजूरी देण्याची तरतुद करण्यात येत आहे .
या नियमांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , शासकीय कर्मचारी मागील 1 जुलैपासून चालु वर्षाच्या 30 जुन पर्यंत सहा महिने अथवा त्यापेक्षा कमी कालावधी करीता वैद्यकी प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास , त्याला चालु वर्षाच्या 1 जुलै रोजी वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहणार आहे .
तसेच दि.01 जुलैपासून चालु वर्षाच्या 30 जुनपर्यंत 06 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधरण रजेवर असल्यास , त्याला चालु वर्षाच्या 01 जुलै रोजी वार्षिक वेतनवाढ देय न होता ती पुढील वर्षाच्या दिनांक 01 जुलै रोजी अनुज्ञेय होईल असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच परिविक्षाधीन म्हणून एखाद्या पदावर थेट नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याची पहिली वेतनवाढ , त्याचा एक वर्षाचा परिविक्षेचा कालावधी पुर्ण झाल्यावर देण्यात यावी अशी तरतुद आहे . तर 01 जुलै रोजी वार्षिक वेतनवाढ देण्याची तरतुद असल्याने , अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियुक्तीनंतर एक वर्षाच्या कालावधीऐवजी दि.01 जुलै रोजी 06 महिने अथवा त्यापेक्षा जास्त सेवा पुर्ण झाल्यानंतर पहिली वेतनवाढ अनुज्ञेय असेल , असे नमुद करण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.