Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee April to Jun 2024 Period Payment audan Shasan Nirnay ] : राज्य शासन सेवेतील राज्य अल्पसंख्याक आयोगास वेतन व वेतन बाबीकरीता सन 2024-25 या आर्थिक वर्षात माहे एप्रिल 2024 ते जुन 2024 करीता अनुदान वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या अल्पसंख्याक विकास विभागांकडून दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन या बाबीकरीता माहे एप्रिल 2024 ते जुन 2024 चे वेतन व वेतनावरील बाबीकरीता अनुदान उपलब्ध करुन देणेबाबत दिनांक 12.04.2024 रोजीच्या सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग यांनी शासनास विनंती केली आहे . यानुसार सदर कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन व वेतनबाबीकरीता माहे एप्रिल 2024 ते जुन 2024 चे अनुदान वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग , मुंबई या कार्यालयासाठी सन 2024-25 या वर्षांमध्ये वित्त विभागाच्या दिनांक 01.04.2024 मधील मार्गदर्शक सुचनांनुसार सद्य स्थितीत वेतन या बाबीकरीता लेखा अनुदान एकूण रुपये 25,84,000/- इतका निधी बिम्स प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे . तर दिनांक 05 एप्रिल 2024 नुसार रुपये 6,46,000/- रुपये ऐवढे वेतन अनुदान अल्पसंख्याक आयोगास वितरीत करण्यात आलेले आहेत . तर रुपये 19,40,000/- ऐवढे अनुदान शिल्लक आहेत .
सदरच्या शिल्लक अनुदानांमधून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगातील अधिकारी / कर्मचारी यांचे माहे एप्रिल 2024 ते जुन 2024 या कालावधीमधील वेतन व वेतन बाबीकरीता रुपये 16,53,356 एवढा निधी वितरीत करण्याची विनंती करण्यात आली आहे . त्या अनुषंगाने सहाय्यक अनुदाने ( वेतन ) , सामाजिक सुरक्षा व कल्यास , समाज कल्याण इतर कार्यक्रम , राज्य अल्पसंख्याक आयोग या लेखाशिर्षाखाली बिम्स प्रणालीवर उपलब्ध असलेले 16,53,356/- रुपये एवढे अनुदान राज्य अल्पसंख्याक आयोगास वितरीत करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे .
या संदर्भात अल्पसंख्याक विकास विभागांकडून दिनांक 25.04.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..