Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Appointed After Resignation Shasan Nirnay ] : राज्य शासन सेवेत नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांने राजीनामा दिल्यानंतर पुन्हा राजीनामा मागे घेवून सेवा नियमित करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 09 मे 2022 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्य शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर नियुक्त झालेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ( NPS ) लागु असणाऱ्यांनी राजीनामा दिला असेल तर अशांना पुन्हा शासन सेवेत घेण्याची विहीत विनंती केल्यास , नियुक्ती प्राधिकाऱ्याने लोकहिताचा विचार करता सदर शासन निर्णयातील अटी / शर्तींच्या अधीन राहून पुन्हा शासन सेवेत घेण्यात येईल .या बाबतची अटी व शर्ती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
सदरचा कर्मचारी हा सचोटी , कार्यक्षमता / वर्तणुक याव्यतिरिक्त अन्य काही सक्तीच्या कारणास्तव राजीनामा दिला असणे आवश्यक असणार आहे . तसेच त्यांने राजीनामा मागे घेणेबाबतची विनंती करणे आवश्यक असणार आहेत . राजीनामा दिल्यानंतर व राजीनामा मागे घेणेबाबतच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्याची वर्तवणुक अनुचित असू नये .राजीनामा मागे घेतल्याच्या दिनांकापासून कर्मचाऱ्यांने 90 दिवसांच्या आत हजर होणे आवश्यक असणार आहेत .
राजीनामा दिल्यानंतर सदरचे पदे अथवा तुलनीय पद उपलब्ध असणे आवश्यक असणे आवश्यक असणार आहेत . जर कर्मचाऱ्यांने एखाद्या खाजगी वाणिज्यिक कंपनी / पुर्णत: अथवा बव्हंशी शासनांच्या मालकीचे / शासनांच्या नियंत्रणाखालील महामंडळे / कंपनी अथवा राज्य शासनांकडून वित्त सहाय्य दिलेली एखादी संस्था यामध्ये किंवा याखाली नेमणुक होण्यासाठी राजीनामा दिला असला तर अशांना परत नियुक्ती जाणार नाही .
सदरचा शासन निर्णय हा अस्थायी कर्मचाऱ्यांना लागु असणार नाही , सदरचा निर्णय हा दि.09 मे 2022 पासून अंमलात येणार आहे , तसेच सदर निर्णय हा राज्यातील मान्यता प्राप्त / अनुदानित शैक्षणिक संस्था , कृषित्तरे विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्नीत अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यांना देखिल लागु असणार आहेत .
या संदर्भात वित्त विभागांकडून दिनांक 09 मे 2023 रोजी निर्गमित शासन निर्णय पुढील लिंकवर क्लिक करुन डाऊनलोड करु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.