Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee anukanpa niyukti yojana shasan nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती योजना संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय नगर विकास विभागाकडून दिनांक 30 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागाचा अनुकंपा नियुक्ती योजना बाबतचा सर्वसमावेशक सुचनांचे एकत्रिकरण असलेला शासन निर्णय दिनांक 21.09.2017 नुसार राज्यातील महानगरपालिका ( बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून / नगरपरिषदा / नगरपंचायतींना सदर निर्णयांमध्ये नमुद फेरफारासह / सुधारणांसह लागु करण्यास मान्यता देण्यात येत आहेत .
यांमध्ये अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ नगरपरिषद / नगर पंचायतींमधील खाली नमुद करण्यात आलेल्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांना लागु असणार आहेत . तसेच ज्या कर्मचाऱ्यांची नगर परिषद / नगरपंचायत सेवेत गट क अथवा गड ड मध्ये विहीतरित्या नियुक्ती करण्यात आलेली आहे व ते नगरपरिषद / नगरपंचायतीच्या आस्थापना सुचीवर आहेत .
तसेच जे कर्मचारी नगरपरिषद / नगरपंचायत सेवेत रोजंदारीने दिनांक 27 मार्च 2000 पुर्वी कार्यरत होते , व त्यांना शासन / नगरपरिषद प्रशासन संचालनालय / विभागीय आयुक्त यांच्याकडील आदेशात सेवेत सामावून घेवून नियुक्ती देण्यात आली आहे असे कर्मचारी ..
तसेच ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत मा. कामगार न्यायालय / मा.औद्योगिक न्यायालय / मा.उच्च न्यायालय / मा.सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाने त्यांना नगरपरिषद / नगरपंचायत सेवेत कायम करण्याचे आदेश दिले असतील व त्याप्रमाणे शासन / नगरपरिषद प्रशासन संचालनालय / विभागीय आयुक्त यांनी पदनिर्मितीस / त्यांना सामवुन घेण्यास मान्यता दिली असेल असे कर्मचारी ..
तसेच जे कर्मचारी हे नगरपरिषदा / नगरपंचायत सेवेत रोजंदारीने दिनांक 27.03.2000 पुर्वी कार्यरत होते व या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झालेली आहे तसेच , समावेशनाकरीता सदर कर्मचारी संबंधित प्रकारच्या पदाकरीता विहीत शैक्षणिक अर्हता धारण करीत आहेत आणि समावेशनासाठी नगरपरिषदा / नगरपंचायत पात्र होते .समावेशन प्रक्रियेच्या दरम्यान मयत झालेले कर्मचारी .
तसेच अनुंकपा नियुक्तीकरीता दिवंगत नगरपरिषद / नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र नातेवाईकाने नगरपरिषद /नगरपंचायत कर्मचारी दिवंगत झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या मुदतीत संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे अर्ज करण्याची अट सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक वर्ष गृहीत धरण्यात येईल , असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच अनुकंपा नियुक्ती योजनाचा लाभ हा महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागु असेल ज्यांमध्ये महानगरपालिका सेवेत रोजंदारीने दिनांक 27 मार्च 2000 पुर्वी कार्यरत होते , व या कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झालेली आहे , तसेच समावेशनकरीता संबंधित प्रकारच्या पदाकरीता विहीत शैक्षणिक अर्हता धारण आहे व समावेशनासाठी पात्र आहे , तथापी समावेशन प्रक्रियेच्या दरम्यान मयत झालेले कर्मचारी पात्र असणार आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.