Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Allowance Increace Finance Department Shasan Nirnay GR ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या लिपिक संवर्गास दरमहा ठोक भत्ता अनुज्ञेय करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

मंत्रालय हे राज्याच्या प्रशासकीय मुख्यालयाचे ठिकाण असून , येथे राज्याच्या प्रशासकीय कारभार त्याचबरोबर धोरण ठरविले जाते , त्यामुळे मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरुप लक्षात घेवून राज्य शासनांकडून असा निर्णय घेण्यात येत आहेत कि , मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभागातील लिपिक – टंकलेखक संवर्गास दरमहा 5000/- रुपये इतक्या रक्कमेच्या ठोक भत्याचे प्रदान करणेकरीता खालील अटींच्या अधिन राहून मान्यता देण्यात येत आहेत .  

यांमध्ये मंत्रालयातील लिपिक – टंकलेखक हे संवर्गबाह्य बदलीने प्रतिनियुक्तीने किंवा कायमस्वरुपी नियुक्तीने इतर क्षेत्रीय कार्यालयात  / विभागात / जिल्ह्यात गेले असल्यास त्यांना सदर दरमहा ठोक भत्ता अनुज्ञेय होणार नाही . तसेच लिपिक – टंकलेखकास सहायक कक्ष अधिकारी पदावर स्थानिक नियमित पदोन्नती मिळाली असल्यास त्यानंतर लगतच्या महिन्यापासून सदर ठोक भत्ता अनुज्ञेय होणार नाही .

तसेच सदर लिपिक संवर्गाच्या रजा खाती देय व अनुज्ञेय रजा शिल्लक असल्यास , संबंधित रजा कालावधीसाठी त्याला सदर ठोक भत्ता अनुज्ञेय असेल . तसेच एका कॅलेंडर महिन्यात पंधस अथवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी असाधारण रजा असल्यास त्या महिन्यात ठोक भत्ता अनुज्ञेय होणार नाही असे नमुद करण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर निलंबन कालावधीसाठी सदरचा भत्ता अनुज्ञेय होणार नाही , तसेच लिपिक – टंकलेखक हा विभागीय सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याची सहायक कक्ष अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याच्या लगतच्या महिन्यापासून त्याला सदर भत्ता अनुज्ञेय होणार नाही . त्याचबरोबर सदर कर्मचारी सेवेत लागल्यापासून ज्या दिनांकास सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या तीन लाभाच्या योजनेनुसार 10 वर्षाची नियमित सेवा पुर्ण होईल , त्यानंतर लगतच्या महिन्यापासून सदर ठोक भत्ता अनुज्ञेय होणार नाही .

या संदर्भातील वित्त विभागांकडून दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *