Spread the love

Live Marathipepar , प्रणिता पवार : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजुर करणे संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नविन अथवा जुनी मोटार कार खरेदी साठी राजपत्रित राज्य शासकीय अधिकाऱ्यांना मुंबई वित्तीय नियमानुसार त्याचबरोबर खाली नमुद सुधारित वेतन मर्यादेनुसार मोटार कार खरेदी अग्रिम मंजुर करण्यात येणार आहेत , सदर सुधारित अटी पुढीलप्रमाणे आहेत .

१. सुधारीत वेतन बँड नुसार ज्या राजपत्रित राज्य शासकीय अधिकाऱ्यांचे ५ वर्षाच्या सेवेनंतरचे मूळ मासिक वेतन रु.५०,०००/- किंवा अधिक आहे अशा राजपत्रित राज्य शासकीय अधिकाऱ्यांना या प्रयोजनार्थ अग्रिम अनुज्ञेय असणार आहेत .

२. नवीन मोटार कार खरेदीसाठी अग्रिमाची रक्कम अधिकाऱ्याच्या वेतन बँड मधील मासिक वेतनाच्या १८ पट किंवा रु.१५,००,०००/- (रुपये पंधरा लक्ष फक्त) किंवा नवीन मोटार कारची प्रत्यक्ष किंमत यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी अनुज्ञेय असेल

३. जुनी मोटार कार खरेदी करण्यासाठी अग्रिमाची रक्कम अधिकाऱ्याच्या वेतन बँड मधील मासिक वेतनाच्या ९ पट एवढी किंवा रु. ७,५०,०००/- (रुपये सात लक्ष पन्नास हजार फक्त) किंवा जुन्या मोटार कारची प्रत्यक्ष किंमत यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अग्रिम अनुज्ञेय राहील .

४. अग्रिमासाठी अर्ज करणाऱ्या अधिकाऱ्याची शासनाच्या सेवेतील नियुक्ती संबंधित पदाच्या सेवाभरती नियमानुसार करण्यात आलेली असली पाहिजे आणि अशाप्रकारे करण्यात आलेल्या नियुक्तीनंतर कमीत कमी ५ वर्षांची सलग सेवा झाली असणे आवश्यक असणार आहे .

५. मोटार वाहन चालविण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून, कुटुंबातील एका व्यक्तिला मिळालेल्या कायम अनुज्ञप्तीची (Permanent Licence) छायाप्रत सादर करणे आवश्यक असणार आहे .

६. अग्रिम मंजुरीपूर्वी अग्रिमासाठी अर्ज करणाऱ्या अधिकाऱ्याची सेवानिवृत्तीपूर्वी संपूर्ण अग्रिम रक्कम परतफेड करण्याची क्षमता असल्याची, अग्रिम मंजूर करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याची खात्री असावी. 

७. अर्जदाराने आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर सक्षम प्राधिकारी, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, अनुसार प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकाराप्रमाणे मोटार कार अग्रिम मंजूर करू शकतील. 

८. मोटार कार अग्रिम मंजुरीच्या दिनांकापासून १ महिन्याच्या आत अग्रिम धारकाने मोटार कार खरेदी करावी. तसेच खरेदी केलेल्या मोटार कारच्या उत्पादनाचे वर्ष, खरेदीची तारीख व नोंदणीचे कागदपत्रे शासनास सादर करावीत. तसे केल्यास अग्रिम धारकाकडून अग्रिमाची संपूर्ण रक्कम १ महिन्यानंतर दंडनीय व्याजासह एक रकमी वसूल करण्यात यावी. 

९. मोटार कार अग्रिमाची व्याजासह पूर्ण परतफेड होईपर्यंत मोटार कार शासनाकडे गहाण राहील. त्यासाठी सबंधित अधिकाऱ्यांस विहित नमुन्यात व कार्यपध्दतीप्रमाणे गहाणखत भरून देणे आवश्यक राहील. गहाण खतामध्ये मोटार कारचा मेक (MAKE), मॉडेल (MODEL) आणि चेसिस क्रमांक (CHASSIS NO.) स्पष्टपणे नमूद करण्यात यावा. नवीन किंवा जुनी मोटार कार अग्रिम धारकाकडून नियमानुसार आवश्यक ते विहित नमुन्यातील करारपत्र (नमुना – २०), गहाण बंधपत्र ( नमुना – २१, २१ए), दुय्यम बंधपत्र (नमुना -२२) व प्रतिभूती बंधपत्र (नमुना – २२ए) घेण्यात यावीत. 

१०.तसेच, असे गहाणखत भरून देण्यापूर्वी सदर मोटार कार यांत्रिकी दृष्टया निर्दोष आहे याची जबाबदारी अग्रिम घेण्या-या संबंधित अधिकाऱ्याची राहील. त्याप्रमाणे जर एखादया प्रसंगी यांत्रिकी दृष्टया निर्दोष नसलेली मोटार कार शासनाकडे गहाण ठेवली गेल्यास व अशा मोटार कारच्या अग्रिमाच्या वसूलीसाठी लिलावाने विक्री करावयाचा प्रसंग उद्भवल्यास अशा लिलावापासून येणाऱ्या रक्कमेपेक्षा शिल्लक राहणारी वसूलपात्र रक्कम दंडनीय व्याजासह संबंधित अधिकाऱ्यांच्या सेवा उपदान, रजेचे रोखीकरण इत्यादी अनुज्ञेय रकमांमधून वसूल करण्यात यावी. ११.मोटार कार अग्रिम वितरीत केल्याच्या पुढील महिन्यापासून अग्रिमाच्या वसुलीस सुरुवात करण्यात यावी.१२.सदर अग्रिमावर शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्या दराने व्याज आकारण्यात यावे. 

१३.अग्रिम मंजूर करताना मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम १२४ (बी) व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे लागू ठरणाऱ्या दंडनीय व्याजाचा उल्लेख मंजूरीच्या आदेशात करण्यात यावा. 

१४. शासकीय विमा निधीकडे मोटार कारचा विमा उतरविण्यात यावा व तो सतत चालू राहील याची संबंधित अग्रिमधारकाने दक्षता घ्यावी. १५.शासकीय सेवेच्या कालावधीत एकदाच मोटार कार अग्रिम अनुज्ञेय राहील. तथापि पूर्वी दुचाकी (मोटार सायकल / स्कूटर / मोपेड) अग्रिम घेतले असेल परंतु आता नियमानुसार मोटार कार अग्रिम अनुज्ञेय होत असल्यास मोटार कार अग्रिम मंजूर करता येईल. १६.दि. १.५.२००१ रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या अर्जदारास 

( दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता) या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही. 

() अग्रिम वसुलीचा कालावधी :- १. नवीन मोटार कार खरेदी करण्यासाठी मंजूर करण्यात येणाऱ्या अग्रिमाची वसूली करताना प्रथमतः मुद्दलाची १०० समान मासिक हप्त्यात वसूली करावी व त्यानंतर व्याजाची वसूली ४० मासिक हप्त्यात करावी. मात्र एखादा अधिकारी नियतवयोमानानुसार उपरोक्त मासिक हप्त्याचे १४० महिने पूर्ण होण्यापूर्वीच सेवानिवृत होणार असेल तर त्याच्या सेवानिवृत्तीपूर्वी संपूर्ण अग्रिमाची व्याजासह वसूली होईल, अशा प्रकारे वसूलीचे हप्ते निश्चित करण्यात यावे. 

२. जुनी मोटार कार खरेदी करण्यासाठी मंजूर करण्यात येणाऱ्या अग्रिमाची वसूली करताना प्रथमत: मुद्दलाची ५० समान मासिक हप्त्यात वसूली करावी व त्यानंतर व्याजाची वसूली २० हप्त्यात करावी. मात्र एखादा अधिकारी नियतवयोमानानुसार उपरोक्त मासिक हप्ते ७० महिने पूर्ण होण्यापूर्वीच सेवानिवृत होणार असेल तर याच्या सेवानिवृत्तीपूर्वी अग्रिमाची व्याजासह वसूली होईल, अशा प्रकारे वसूलीचे हप्ते निश्चित करण्यात यावे. 

() अग्रिम व्याजाचा दर :- व्याज दराबाबत अन्य आदेश निर्गमित होईपर्यंत या आदेशान्वये मोटार कार खरेदी करण्यासाठी मंजूर करण्यात येणाऱ्या अग्रिम प्रकरणी व्याजाची परिगणना १०% या दराने करावी. 

या संदर्भात वित्त विभागांकडून दि.17.10.2023 रोजी  निर्गमित सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय ( GR )

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *