Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee IMP SHASAN NIRNAY Publish ] : राज्यातील वय वर्षे 40 ते 50 या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 08 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दि.22.04.2022 व सामान्य प्रशासन विभागांकडून दि.08.12.2022 रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असणारे वय वर्षे 40 ते 50 या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातुन एकदा व वय वर्षे 51 व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुज्ञेय असल्याबाबत त्याचबरोबर वैद्यकीय तपासणीकरीता रुपये 5000/- रुपये या प्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपुर्ती प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करणेबाबत , शासनाने मान्यता दिलेली आहे .
शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व सार्वजनिक आरोग्य विभागांच्या अनिधनस्त आरोग्य संस्थामार्फत उपलब्ध उपलब्ध नसलेल्या चाचण्या ह्या बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आलेली आहेत . शासन निर्णयातील नमुद केलेल्या चाचण्या महसुल विभाग निहाय खाजगी रुग्णालयात निर्धारित केलेल्या दराने गृह विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी लागु करण्याबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे , त्या अनुषंगाने शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्याची बाब शासनांच्या विचाराधीन आहे , यानुसार पुढीलप्रमाणे निर्णया घेण्यात येत आहेत .
सदरच्या शासन शुद्धीपत्रकानुसार वय वर्षे 40 ते 50 या वयोगटातील गृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातुन एकदा व वय वर्षे 51 व त्यावरील वयोगटातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुज्ञेय असल्याबाबत , त्याचबरोबर वैद्यकीय तपासणीकरीता रुपये 5000/- रुपये या प्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपुर्ती गृह विभागातील प्रत्येक अधिकारी / कर्मचारी यांना अदा करण्याबाबत सदर शासन निर्णयान्वये अपवादात्मक बाब म्हणून..
सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक 08 डिसेंबर च्या प्रपत्र अ येथे नमुद करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयाद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहेत .सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने आवश्यक असल्यास विहीत कार्यपद्धती निश्चित करण्याची कारवाई गृह विभागामार्फत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , तसेच वरील नमुद संदर्भाधिन शासन निर्णयातील सर्व बाबी लागु असणार आहेत .
या संदर्भातील सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 08 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.