Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee Agau Vetanvadh Niyamavali ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांना मागील पाच वर्षांच्या गोपनिय अहवालाच्या आढाव्यानुसार आगाऊ वेतनवाढ लागु करण्यात येत असते . या संदर्भातील आगाऊ वेतनवाढ नियम 40 बाबत माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
आगाऊ वेतनवाढी मंजुरी करण्याचा अधिकार हे राज्य शासनाने नियुक्ती केलेल्या अधिकाऱ्यांस असतो . आगाऊ वेतनवाढीचा कर्मचाऱ्यांस हक्क नसून तो सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वेच्छा अधिकारी आहे . कर्मचाऱ्यांच्या मागील गोपनिय अहवालांच्या आढावा , तसेच सदर संवर्गातील कर्मचाऱ्यांची संख्या यावर आगाऊ वेतनवाढी अवलंबून असते .
कर्मचाऱ्यांच्या मागील 05 वर्षांच्या गोपनिय अहवाल सी आर हे A+ असतील अशा वेळी तसेच दोन गोपनिय अहवाल ( सी आर ) हे A + व दोन सी आर हे A असतील अशा वेळी सदर कर्मचाऱ्यांस आगाऊ वेतनवाढ मंजूर करता येत असते . तर कोणत्याही परिस्थितीमध्ये पाच वर्षांच्या कमी सेवा कालावधीसाठी आगाऊ वेतनवाढी मंजूर करता येत नाहीत .
जर आगाऊ वेतनवाढ ही पदोन्नतीनंतर एक वर्षाच्या आतमध्ये मंजूर केली असल्यास अशा वेळी पदोन्नतीच्या दिवशीच आगाऊ वेतन वाढ दिली असे समजूर पदोन्नती पदाची फेर वेतननिश्चिती केली जाते . नविन वेतन संरचनेमध्ये म्हणजेच सातव्या वेतन आयोगांमध्ये आगाऊ वेतनवाढी कशा मंजूर कराव्यात याबाबत शासन आदेश प्रलंबित असल्याने , जुन्या प्रमाणेचे आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याचे आदेश आहेत .
तर राज्य शासनांच्या निर्देशानुसार दिनांक 01 जानेवारी 2006 ते दिनांक 31.12.2015 या काळांमध्ये आगाऊ वेतनवाढ अनुज्ञेय होणार नाहीत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.