लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनासारखे विशेष लाभ मिळणार असल्याचे केंद्र सरकारने घोषित केले आहेत . त्याचबरोबर केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांना देखिल पेन्शनची रक्कम आगाऊ स्वरुपात मिळणार आहे . आगामी काळांमध्ये गणेश चतुर्थी व ओणम हे सण येत असल्याच्या पार्श्वभुमीवर केरळ व महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांना आगाऊ वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार केरळ राज्यातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट महिन्याचे वेतन आगाऊ दिले जाणार आहेत , तर महाराष्ट्र राज्यातील केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना माहे सप्टेंबर महिन्याचे आगाऊ वेतन अदा केले जाणार आहेत .महाराष्ट्र राज्यात गणपती उत्सव दि.27 सप्टेंबर वार बुधवार रोजी येत आहे तर केरळ राज्यात ओणम हा सण दि.25 ऑगस्ट रोजी येत असल्याने सदर राज्य कर्मचाऱ्यांने आगाऊ वेतन अदा करण्यात येणार आहेत .
केरळ व महाराष्ट्र राज्यातील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच केंद्र सरकारच्या औद्योगिक कर्मचाऱ्यांना देखिल आगाऊ वेतन अदा करण्यात येणार आहेत .या संदर्भात आगाऊ वेतन / पेन्शन विहीत कालावधीत अदा करण्यासाठी केरळ / महाराष्ट्र राज्यातील बँकांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तर केरळ राज्य सरकारने केरळ राज्य कर्मचाऱ्यांना ओणम सणासाठी 4 हजार रुपये बोनस जाहीर केला आहे , तर बोनससाठी अपात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखिल 2750/- रुपेय विशेष उत्सव भत्ता देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे .
आता महाराष्ट्र राज्य सरकारने देखिल मागील वर्षी गणपती उत्सव साजरा करण्यासाठी आगाऊ वेतन अदा करण्यात आले होते , तुर्तास राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन देण्याचे कोणतेही परित्रक निर्गमित करण्यात आले नाहीत , परंतु महाराष्ट्र राज्य सरकार कडुन याबाबत लवकरच परिपत्रक निर्गमित करण्याची शक्यता वर्तविली जात आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !