Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee administrative transfer news ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या बाबत निर्णय कधी होणार ? याकडे राज्यातील लाखो कर्मचारी प्रतिक्षेत आहेत , या संदर्भात मंत्रालयीन स्तरावर नेमक्या कोणत्या हालचाली सुरु आहेत , याबाबतची सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

शासन आदेश येईपर्यंत केवळ विनंती बदल्या : सध्या प्रशासकीय बदल्यांस स्थगिती देण्यात आलेली असून केवळ विनंती बदल्या तेही मा. मुख्यमंत्री यांच्या सहीने परवानगी देण्यात आलेली आहे . निवडणुकांचे कारण सांगत राज्य शासनांकडून तुर्तास प्रशासकीय बदल्यांस स्थगिती देण्यात आलेली आहे .

सर्व विभागांकडून बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी जाहीर : राज्यातील सर्व विभागांकडून बदली पात्र अधिकारी / कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे . यानुसार सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या नजरा ह्या प्रशासकीय बदल्याकडे लागले आहेत . ज्या कर्मचाऱ्यांचे नाव हे बदलीपात्र यादींमध्ये आले आहेत , त्यांना नविन ठिकाणी बदलीसाठी उत्सुकता लागली आहे .

नविन आदेश पारित झाल्याशिवाय प्रशासकीय बदल्या नाही : सध्या राज्यांमध्ये दिनांक 06 जुन 2024 पासुन लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहिता संपुष्टात आलेल्या आहेत , तर दिनांक 01 जुलै रोजी विधानपरिषद निवडणुक प्रक्रिया पुर्ण झाल्याच्या नंतर राज्यात आचारसंहिता संपुष्टात आलेली आहे , तरी देखिल राज्य शासनांकडून बदली बाबत सुधारित आदेश जारी करण्यात आलेले नाहीत . तर बदली पात्र कर्मचाऱ्यांकडून बदलीबाबत सुधारित आदेश पारित करण्याची मागणी करण्यात येत आहेत . कारण नविन आदेश पारित झाल्याशिवाय प्रशासकीय बदल्या होणार नाहीत .

बदलीबाबत मंत्रालयीन हालचाली : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदली बाबत विभाग निवाह बदली पात्र अधिकारी / कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आलेली असून केवळ सामान्य प्रशासन विभागांकडून बदली बाबत नविन आदेश पारीत होण्याची वाट पाहण्यात येत आहे .

याबाबत राज्य शासनांकडून सुधारित निर्णय घेतल्यास , पुढील महिन्यांमध्ये प्रशासकीय बदल्यांस सुरुवात होईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *