Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee 7th Pay Commission Remain Installment Paid With February Month Payment ] : माहे फेब्रुवारी 2024 च्या वेतन देयकासोबत सातव्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता तसेच राहीलेलेले उर्वरित पहिला , दुसरा व तिसरा हप्तासह ऑनलाईन पद्धतीने पारित करणेबाबत राज्य शासनांच्या शिक्षण संचालनालय विभागांकडून दिनांक 14.02.2024 अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्राकानुसार , शिक्षण संचानालय विभागाच्या दिनांक 30 जानेवारी 2023 रोजीच्या पत्रकानुसार उर्वरित लेखाशीर्षाबाबत , स्वतंत्र आदेश / आदेश निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती . यानुसार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजीच्या व्हिसी मध्ये देण्यात आलेल्या निर्देशानुसार , लेखाशीर्ष क्र.22020442 , 22020478 , 22023361 , 22023379 , 22020511 , 22020469 , 22020502 , 232021901 , 22021948 , 220 एच 973 मध्ये …
मयत , सेवानिवृतत तसेच कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सातव वेतन आयोगाचा पहिला , दुसरा , तिसरा हप्ता राहीला असल्यास अदा करण्याचे तसेच चौथा हप्ता माहे फेब्रुवारी 2024 चे वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
जर भविष्यात सातवा वेतनाचा पहिला , दुसरा , तिसरा व चौथा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास , संबंधित शिक्षणाधिकारी व अधिक्षक , वेतन पथक ( माध्यमिक ) यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोद घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . यांमध्ये उपलब्ध करुन दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार केलेल्या मागणीच्या मर्यादेत खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक दिपक चवणे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात राज्य शासनांच्या शिक्षण संचानालय विभागांकडून दि.14.02.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.