लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सातवा वेतन आयोगाचे पहिला , दुसरा , तिसरा व चौथा हप्ता अद्याप अनेक कर्मचाऱ्यांचा बाकी आहे . तर अशा कर्मचाऱ्यांना उर्वरित 7 वा वेतन आयोगाचे हप्ते अदा करण्यासाठी निधीची उपलब्धता राज्य शासनांकडून करुन देण्यात आलेली आहे , यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचे पहिला , दुसरा , तिसरा व चौथा हप्ता बाकी आहे , अशा कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट 2023 पर्यंत उर्वरित थकबाकीची रक्कम अदा करण्यात येणार आहे .
राज्य शासनांच्या प्राथमिक शिक्षण संचालनांकडून राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते तसेच इतर देयके अदा करण्यासाठी निधी मंजुर करण्यात आलेला होता , परंतु निधीची उपलब्धतेनुसार सातवा वेतन आयोगाचे हप्ते व इतर देयके अदा करण्यात येत आहेत . यांमध्ये काही शिक्षकांना पहिला , दुसरा , तिसरा व चौथा हप्ता अदा करण्यात आलेले आहेत .उर्वरित कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट महिन्यांचे वेतन देयकाबरोबर अदा करण्यात येणार आहेत .
यांमध्ये राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता अदा करण्यासाठी 96,97,26,000/- रुपये तर सातवा वेतन आयोग थकबाकीचा दुसरा हप्ता अदा करण्याकरीता 893,70,59,000/- , त्याचबरोबर सातवा वेतन आयोग तिसरा हप्ता अदा करणेकामी 9666,45,65,000/- रुपये तर चौथा हप्त्यासाठी 1150,00,00,000/- रुपये इतका निधी तसेच इतर प्रकारचे दयके सादर करण्यासाठी 84,70,71,000/- रुपये इतका निधी वितरीत करण्यास प्राथमिक संचालनालय ( शिक्षण ) यांच्याकडून मान्यता देण्यात आलेली आहे .
याकरीता अधिवेशनांमध्ये रक्कम रुपये 3504,38,70,000/- रुपये इतक्या तरतुदीची पुवणी मागणी संचालनाकडून शासनास करण्यात येणार आहे , पुरवणी मागणी राज्य शासनांकडून मंजुर करण्यात येणार असल्याने माहे ऑगस्ट महिन्यापर्यंत उर्वरित सातवा वेतन आयोगाचा पहिला , दुसरा , तिसरा व चौथा हप्ता अदा करण्यात येणार आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !