Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee 7th pay commission 5th installment shasan nirnay ] : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2024 रोजी देय असलेले सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करणेबाबत वित्त विभागांकडून दिनांक 20 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार असे आदेशित करण्यात आले आहेत कि , राज्यातील सरकारी व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक 01.07.2023 रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन व निवृत्तीवेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम पुढीलप्रमाणे नमुद केल्यानुसार , GPF अथवा रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
यांमध्ये निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम ही माहे जुन 2024 च्या निवृत्तीवेतनासोबत ( पेन्शन ) अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सदर 5 व्या हप्त्यची रक्कम ही माहे जुन 2024 च्या वेतनासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तर यापैकी ज्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागु आहे , अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम ही त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यांमध्ये ..
तर ज्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागु आहे अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम ही रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , तसेच जे कर्मचारी हे दिनांक 01.06.2023 ते सदर निर्णयापर्यंत मृत्यु अथवा सेवानिवृत्त झाले असतील अशा कर्मचाऱ्यांना सदर 5 व्या हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर वित्त विभागाच्या दिनांक 20.02.2019 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या 5 व्या हप्त्याच्या रक्कमेवर दिनांक 01.07.2023 पासुन व्याज अनुज्ञेय असणार आहेत .
याबाबतचा वित्त विभागांकडून दिनांक 20.06.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता …
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.