Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 7 th Pay Commission Arrears ] : यंदा कर्मचाऱ्यांची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे . कारण दिवाळी सणापुर्वीच राज्यातील कर्मचाऱ्यांचे थकीत रकमा त्याचबरोबर इतर थकीत बिले हे दिवाळी सणापुर्वीच सादर करण्याची मागणी करण्यात आलेली आहे .
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने वेतन पथक अधिक्षक यांची भेट घेवून राज्यातील शिक्षक – कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे थकीत रक्कमा तसेच इतर थकीत देयके दिवाळी सणांपुर्वीच अदा करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले आहे .
राज्य शासनांच्या आदेश नुसार , अंशदायी पेन्शन योजना लागु असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगांमधील फरकाची रक्कम ही रोखीने अदा करण्याचे निर्देश आहेत तर सन 2005 पुर्वीच्या कर्मचाऱ्यांना GPF खात्यात दरवर्षी एक याप्रमाणे पाच टप्यांमध्ये रक्कमा वितरीत करणेबाबत , राज्य शासनांचे निर्देश आहेत .
सदर राज्य शासनांच्या आदेशानुसार आतापर्यंत 3 ते 4 टप्पे कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणे आवश्यक होते , परंतु आजपर्यंत काहींना 01 तर काहींना दुसरा हप्ता अदा जमा करण्यात आलेला नाही .त्याचबरोबर सन 2005 पुर्वीचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी , सेवानिवृत्त कर्मचारी यांचा देखिल 01 तर काहींचा 02 हप्ता हप्ता GPF खात्यांमध्ये जमा करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आलेली आहे .
तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सदर निवेदनांनुसार उर्वरित थकित 3 व 4 हप्याच्या रक्कमा कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये दिवाळीपुर्वीच जमा करणेबाबत निवेदन सादर करण्यात आलेले आहेत . यावेळी शिक्षक परिषदेचे शहर अध्यक्ष श्री. बाळासाहेब बोडखे यांनी उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर व वेतन पथक अधिक्षक रामदार म्हस्के यांची प्रत्यक्ष भेट देवून निवेदन सादर करण्यात आले आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.